US And iran conflict: अमेरिकेने गुरुवारी पहाटे इराणवर नवीन हवाई हल्ले सुरू केले आणि तेहरानने बहरीन, कुवेत आणि कतारला लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. या चकमकींमुळे पर्शियन आखातातील युद्ध संपवण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने असलेल्या अंतरिम कराराला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. असे वृत्त एपी वृत्त संस्थेने दिले आहे.
नौकानयनाच्या स्वातंत्र्याला धोका
अमेरिकन सेंट्रल कमांड प्रमुखांच्या आदेशाने म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नौकानयनाच्या स्वातंत्र्याला इराण धोका निर्माण करत असून इराणची ही क्षमता आणखी कमी करण्यासाठी अतिरिक्त हल्ले सुरू केले आहेत. एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय जलमार्गातून मुक्तपणे प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर आणि नागरी कर्मचाऱ्यांवर अलीकडे झालेल्या अन्यायकारक आक्रमणासाठी अमेरिका इराणला जबाबदार धरत आहे. असे एक्सवर पोस्ट करून अमेरिकेच्या सेंट्रल कमांडतर्फे माहिती देण्यात आली आहे.

तज्ज्ञांनी देखील शांतीवार्ताबाबत सांशकता व्यक्त केली आहे. याठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होत आहे, की दोन्ही बाजू होर्मूझ नियंत्रणाच्या मुद्दयांवर अडकून पडले आहे. हल्ल्याने आता होर्मूझची कोंडी निर्माण झाली आहे. इराण या सामुद्रधुनीवर पूर्ण नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात आहे, तर अमेरिकेला हा मार्ग नियंत्रण मुक्त हवा आहे, या मुद्द्यावर दोन्ही बाजू अडून बसल्या आहेत, असे वृत्त अल जंजिराने दिले.
होर्मूझवरून तणाव वाढला
*इराणला विश्वास आहे, होर्मुझची सामुद्रधुनी ही अंतिम करारासाठी महत्त्वाची आहे, इराण होर्मूझवर आपले नियंत्रण सोडण्यास तयार नाही.
वाटाघाटीच्या करतांना इराण अमेरिकेला सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी भाग पाडू शकेल, भविष्यात जर अंतिम करार झाला, तर अमेरिका त्या कराराचे पालन करेल याची खात्री इराण बाळगून आहे. त्यामुळेच दोन्ही पक्ष आपली भूमिका बदलत नसल्याने होर्मूझवरून दोन्ही देशात तणाव वाढत आहे..
*अमेरिकेच्या लष्कराने म्हटले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर हल्ला करण्याची तेहरानची क्षमता कमी करण्यासाठी त्यांनी आज सकाळी इराणच्या हद्दीतील ९० लक्ष्यांवर हल्ले केले.
*अमेरिकेच्या या हल्ल्यांमध्ये पूल, मालधक्का आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात इराण शहरमध्ये एक आणि अहवाजमध्ये तीन जण ठार झाले. चहबहारमधील एका रुग्णालयालाही स्फोटाचे तुकडे लागले.
*’आयआरजीसी’ने अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून कुवेतच्या कॅम्प आरिफजान आणि अली अल सालेम तसेच बहरीनच्या जुफैर आणि शेख ईसा तळांना लक्ष्य केले आहे.
*ट्रम्प म्हणाले की, तेहरानला ‘करार करण्याची तीव्र इच्छा’ असल्याचा त्यांनी आग्रह धरला आहे.
*इराणचे संसद अध्यक्ष गालिबाफ म्हणतात की, तेहरान प्रत्युत्तर देईल आणि इशारा दिला की “धमकावणे आणि वचनभंग करणे आता विनाकारण होणार नाही”
*कुवेतच्या लष्कराने दावा केला आहे की, आयआरजीसी केलेले द्रोण हल्ले डिटेक्ट करून निष्किय केल्याचे सांगितले आहे.








