होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तब्बल ८ हजार सायकलिस्टचे भव्य रिंगण; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले, महापौर दीपमाला काळे यांचाही सहभाग

On: July 12, 2026 7:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला. रविवारी पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या ८ हजार सायकलिस्टनी सुरुवातीला पंढरपूर शहराला फेरी मारून नंतर घडवून आणलेल्या भव्य आणि शिस्तबद्ध सायकल रिंगणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

वारीच्या सांगता सोहळ्यात रविवारी, दिनांक १२ जुलै रोजी पंढरपूर येथे एक अभूतपूर्व सोहळा रंगला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध सायकलिस्ट ग्रुपच्या सुमारे ८ हजार सायकलपटूंनी पंढरपूरमध्ये सायकलचे एक मोठे आणि भव्य रिंगण तयार केले. या आधी पंढरपूर शहराला देखील त्यांनी पूर्ण एक फेरी मारून मग रिंगण बनवून ते पूर्ण केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे शिस्तबद्ध आणि विहंगम रिंगण पाहण्यासाठी पंढरीत मोठी गर्दी झाली होती.

या सायकल रिंगणाने प्रत्येक भाविकाचे डोळे आणि मन मोहून घेतले. या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यात जळगावच्या महापौर दीपमाला काळे आणि जळगावातील ७५ सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: बोधगया यात्रेला जाताय, मग ‘या’ दिवशी विशेष तीर्थयात्रा रेल्वेचे होणार प्रस्थान

प्रवाश्यांच्या खिशाला झळ: एसटीची १३ टक्के भाडेवाढ

राज्यातील SIR ला मुदतवाढ: मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; तारखा अशा ‘ते’जाणून घ्या

Car-Dumper Accident : लग्नानंतरच्या पहिल्याच प्रवासात सात जन्माची गाठ सुटली, कार-डंपरच्या अपघातात नवविवाहितेसह चौघे ठार

Rain Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात पुढील 4-5 दिवसात तुरळक स्वरुपाचा पाऊस; 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार

तीन वर्षात रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र; रेल्वे पायाभूत विकासाबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ‘ते’ जाणून घ्या

Leave a Comment