होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अवैध गुटखा विक्री: चोपडा तालुक्यात अन्नसुरक्षा विभागाची धाड, दोघांवर गुन्हा

On: July 12, 2026 3:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Chopda News: शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दोन दुकानांवर धाड टाकून मानवी आरोग्यास अपायकारक असणारा विमल गुटखा, सुगंधित तंबाखू व करमचंद पान मसाला जप्त करून दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, अन्नसुरक्षा अधिकारी आकाश बोराडे व शहर पोलिसांच्या टीमने संयुक्तिक काही दुकानाची तपासणी केली असता चोपडा शहरातील भाजी मंडईतील रॉयल फ्रुट दुकानाच्या समोरील सार्वजनिक जागेवर फिरोज हुसेन बागवान (रा.दर्गाअली) आझाद चौक, हा मानवी आरोग्यास घातक व असुरक्षित विमल पान मसाला, करमचंद पान मसाला, तानसेन पान मसाला, व्ही१ सुगंधित तंबाखू असे अवैधरित्या विक्री करताना आढळून आला. तसेच विरवाडा गावातील प्रवीण प्रल्हाद पाटील हा आपल्या मालकीच्या भोलेनाथ पान सेंटरमध्ये अवैधरिता विमल गुटखा विक्री करतांना आढळून आल्याने माल जप्त करण्यात आला असून पोलिस कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान जळगाव कार्यालयात अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपीतांविरुध्द चोपडा शहर पोलिसात अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६/२ ,सहवाचता कलम ३० (२) तसेच कलम २६ (२ )(४), २७( ३ )(d), २७ (३ )(e), ३ (२) zz( lV) सहवाचता अन्नसुरक्षा आयुक्तांच्या दिनांक १६ जुलै रोजीच्या शासन राजपत्र आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम ५९ नुसार गुन्हा केलेला आहे. तसेच भारतीय न्याय संहिता( BNS) नुसार कलम १२३, २७५, २७४, २२३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment