होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच मंजूर होतील: मा. न्यायमूर्ती बी आर गवई

On: July 10, 2026 1:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच मंजूर होतील, असा विश्वास सर्वोच्च नायालयाचे मुख्य न्यायधीश बी आर गवई यांनी व्यक्त केला आहे. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने मा. न्यायमूर्ती गवई यांना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याचे एक निवेदन शिष्ठमंडळातर्फे देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या प्रस्तावाबाबत त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

निवेदनाचा आशय असा

मागील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी पुढेही आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष श्यामभाऊ शिंदे यांनी न्यायमूर्ती गवई यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देऊन प्रस्ताव मंजुरीसाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यावर न्यायमूती गवई यांनी कर्मचारी, प्रतिनिधीच्या उपस्थितीत सांगितले की, सदर प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू असून तो लवकरच मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. जोशी, सर्व न्यायाधीशवृंद, प्रभारी प्रबंधक कोठावदे, जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment