Bhusawal News: ‘उर्स’ उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने नागपूर – नाशिक रोड दरम्यान दोन अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यामुळे प्रवाश्याना गर्दीच्या वेळेत दिलासा देणाऱ्या आहेत, खान्देशच्या प्रवाशांना या गाड्यांचा फायदा होणार आहे.
नागपूर – नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी (२ सेवा)
अनारक्षित गाडी (क्रमांक ०१२१४) सोमवार पासून सुरू झाली आहे, नागपूर येथून १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४० वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१३ ही आज १४ जुलैला नाशिक रोड येथून ०७:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १९:२० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडीला अजनी, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि मनमाड आदी थांबे आहेत.

अनारक्षित तिकीट बुकिंगसाठी प्रवासी ‘रेलवन’ प्रवासी ॲप डाउनलोड करू शकतात. या गाड्यांच्या वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीइएस’ ॲप डाउनलोड करा.








