होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Dance Bar Rule: अश्लील नृत्य करणाऱ्यांची आता खैर नाही! ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार नियमांमध्ये मोठे बदल

On: July 8, 2026 1:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Dance Bar Rule: महाराष्ट्रातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्याचा धिंगाणा सुरु आहे. मात्र, आता या धिंगाण्यावर लगाम घातली जाणार आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखली सुरु असलेला हा प्रकार आता खपवन घेतला जाणार नाही. सरकारने या बाबात कठोर पाऊल उचलले आहे. ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार नियमांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विधानसभेने नृत्यबंदी कायद्यात सुधारणा करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण विधेयकाला मंजुरी दिली आहे. ज्यानुसार अश्लील नृत्यांवर बंदी घालण्यासाठी परवाना पद्धतीत बदल करण्यात येणार आहेत.

 

विधानसभेने मंजूर केलेल्या महाराष्ट्र डान्स बार कायदा सुधारणा विधेयकानुसार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमांच्या नावाखाली सादर होणाऱ्या अश्लील नृत्यांवर बंदी घालण्यासाठी परवाना पद्धतीत बदल करण्यात आले आहेत.

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याबाबत सादर केलेल्या नवीन तरतुदींनुसार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये होणाऱ्या लाइव्ह म्युझिक आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांसाठी परवाने आता महाराष्ट्र पोलीस कायद्याऐवजी २०१६ च्या विशेष कायद्यांतर्गत दिले जातील. यामुळे नियमांची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित होईल आणि उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करणे शक्य होईल.

 

परवाना होणार रद्द

 

सुधारित कायद्यानुसार, जर एखाद्या आस्थापनेने तीन वेळा नियमांचे उल्लंघन केले, तर तिचा परवाना रद्द केला जाणार आहे. दरम्यान, सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘अश्लील नृत्य’ या शब्दाची कायदेशीर व्याख्या स्पष्ट करण्याबाबत आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारकडे उत्तरांची मागणी केली. तसेच काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले की, बेकायदेशीर डान्स बार पोलीस संरक्षणाशिवाय चालू शकत नाहीत आणि प्रभावी कारवाई आवश्यक आहे. आमदार संजय केळकर यांनीही पर्यटन स्थळांवरील अश्लील कार्यक्रम आणि अमली पदार्थांच्या वापरावर कठोर कारवाईची मागणी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment