Pachora News: पाचोरा-भडगाव मतदारसंघ चाळीसगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जर असा प्रयत्न झाल्यास माझी आमदारकी पणाला लावण्याचा आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला दिल्याने सत्ताधारी महायुतीचे पाचोरा आणि चाळीसगावच्या आमदार आमनेसामने आल्याने पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे.
पाचोरा-भडगाव मतदारसंघाला प्रस्तावित चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या हालचालींना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. वेळ पडली तर माझी आमदारकी पणाला लावण्याची ठाम भूमिका त्यांनी शुक्रवारी दुपारी २ वाजता “शिवालय ” शिवतीर्थ कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

भडगाव-पाचोरा नागरिकांवर अन्याय
आमदार किशोर पाटील म्हणाले की, चाळीसगाव शहराला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय देण्यास त्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र पाचोरा-भडगाव मतदारसंघ त्याला जोडणे म्हणजे येथील नागरिकांवर अन्याय करणारा निर्णय ठरेल. जळगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा रुग्णालय, कृषी विभाग, जिल्हा सत्र न्यायालय, समाज कल्याण कार्यालय व इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची अनेक कामे एकाच ठिकाणी होतात. परंतु चाळीसगावला जोडल्यास पाचोरा-भडगाव मतदारसंघातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वकील यांना अनावश्यक प्रवास व आर्थिक भार सहन करावा लागेल व मनस्ताप होईल.
या विषयावर आपण यापूर्वी विभागीय आयुक्त, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी हा प्रस्ताव योग्य नसल्याचे मान्य करून तो मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र पुन्हा हा प्रस्ताव पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संपूर्ण मतदारसंघात तीव्र नाराजी आहे, असे त्यांनी नमूद केले.
..तर जेलभरो आंदोलन
विभागीय आयुक्त तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार असून, त्यासाठी हजारो नागरिकांच्या सह्या गोळा केल्या जाणार आहेत. आवश्यकता भासल्यास संपूर्ण मतदारसंघात जनआंदोलन, रस्ता रोको, जेलभरो आंदोलन अशा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनांचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
आमदारकी पणाला लावू
“पाचोरा-भडगाव मतदारसंघ चाळीसगावला जोडण्याचा निर्णय झाला, तर माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल; मात्र मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही,” असे विधान आमदार किशोर पाटील यांनी केले. हा लढा केवळ राजकीय नसून मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचा असल्याचे सांगत त्यांनी सर्व पक्ष, वकील संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकजुटीने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
असे त्यांनी नमूद केले.
सह्यांची मोहीम राबवणार
या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त तसेच जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार असून, त्यासाठी हजारो नागरिकांच्या सह्या गोळा केल्या जाणार आहेत. आवश्यकता भासल्यास संपूर्ण मतदारसंघात जनआंदोलन, रस्ता रोको, जेलभरो आंदोलन अशा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनांचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
एकजुटीने अंदोलन करू
हा लढा केवळ राजकीय नसून मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचा असल्याचे सांगत त्यांनी सर्व पक्ष, वकील संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकजुटीने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील नगरसेवक प्रवीण ब्राम्हणे, सतीश चेडे, गंगाराम पाटील, सुमित सावंत, योगेश पाटील ,विकी बाविस्कर, भडगाव नगरसेवक लखीचंद पाटील, भुरा आप्पा, राजेंद्र पाटील, संजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








