होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Weather : पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

On: January 31, 2026 10:14 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा जिल्ह्यात २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

१ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्यास सुरुवात होईल. प्रामुख्याने २ ते ५ फेब्रुवारी या काळात दुपारी ४ वाजेनंतर अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल. काही ठिकाणी हा पाऊस तुरळक असेल, तर काही ठिकाणी अचानक ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या काळात वाऱ्याचा वेग ४० – किमी प्रतितास इतका राहू शकतो, ज्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

नेमकी ही स्थिती का निर्माण झाली?

हवामानातील बदल : सध्याच्या अवकाळी पावसामागे जागतिक हवामानातील मोठे बदल कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञ यांनी सांगितले.

समुद्राचे तापमान : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण झाले आहे.

बाष्पयुक्त ढंग : बाष्पाचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात ढगांची दाटी होत आहे. यामुळे अवकाळीची स्थिती निर्माण होत आहे.

पश्चिमी विक्षोभ : उत्तरेकडून येणारा पश्चिमी विक्षोभसक्रिय झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असून, याचा प्रभाव पुढील आठवड्यापर्यंत कायम राहू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अमळनेर तालुक्यात भूजलपातळी घटली! पाडळसरे परिसरातील तापी, बोरी, पांझरा पट्ट्यात केळी, पपईला बसला फटका

Leave a Comment