होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दिल्लीला छावणीचे स्वरूप: जंतरमंतरवर आदोलकांची गर्दी; पोलिसांनी लाठीचार्ज करून पांगवले

On: July 20, 2026 11:59 AM
Follow Us:
---Advertisement---

Cockroch Janta Party: नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला नाट्यमय वळणावर आले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली आज संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.आंदोलक जंतर मंतरवरून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले होते. पोलिसांनी अनेक लोकांना ताब्यात घेतले आणि लाठीचार्ज करून त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. सकाळी १० वाजेपासून जंतर मंतरवर आंदोलक जमले. खासदार चंद्रशेखर आझाद संसद मोर्चासाठी जंतर मंतरवर पोहोचले आहेत. प्रवाश्यांसाठी मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले.

तसेच आदोलनस्थळी रॅपिड ऍक्टिव फोर्स आणि दंगल नियंत्रण ‘वज्र’ वाहने तैनात करण्यात आली आहेत. दिल्ली परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनी आरोप केला आहे की, त्यांना आंदोलनस्थळी पोहोचू दिले नाही. दोन्ही नेत्यांनी असाही आरोप केला आहे की, त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. दरम्यान सरकार आणि आंदोलक यांच्यात मागील दराने चर्चा ही सुरू आहे.

आम्ही संसदेत लढू

चंद्रशेखर आझाद म्हणाले की, सरकार आपला ‘धर्म’ पाळत आहे, पोलीस आपला ‘धर्म’ पाळत आहेत आणि या भूमीप्रती माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी या संघर्षाचा एक भाग आहे. एक भारतीय तरुण म्हणून, मी तरुणांच्या वेदना समजू शकतो. मी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी येथे आलो आहे. त्यांच्यासोबत अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. सरकार हे घडू देत आहे…” ते पुढे म्हणाले, “आम्ही संसदेतही लढू.”

मेट्रो स्टेशन बंद

सुरक्षेचे कारण पुढे करत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ ही महत्त्वाची पाच मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद केली आहेत. गेल्या काही तासांपासून जंतरमंतर परिसरात दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी घटनास्थळी वॉटर कॅनन आणि दंगल नियंत्रण ‘वज्र’ वाहने तैनात करण्यात आली आहेत. शिवाय, संपूर्ण परिसरात मोबाईल जॅमर्स बसवून नेटवर्क ठप्प करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

बागडिही-झारसुगुडा चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस गाडी रद्द

मेल्टिंग पॉट फूड प्रॉडक्ट्सने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ हरपाल सिंह सोखी यांची इन्व्हेस्टर आणि ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

Leave a Comment