Cockroch Janta Party Protest: सीजेपीच्या प्रवक्त्यांना आज जेपी नड्डा यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते, त्याप्रमाणे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जे पी नड्डा यांची निवासस्थानी भेट देत एक निवेदन दिले. आशुतोष रांका म्हणाले की, नड्डाजींनी आमच्या मागण्यांवर त्यांच्या नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी काही वेळ मागितला आहे. त्यामुळे अखेर गेल्या २२ दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल सरकारकडून घेण्यात आली असून सीजेपीने सरकार समोर चर्चे दरम्यान महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत,
‘या’ मागण्या समोर ठेवल्या
सरकारला अखेर कॉकरोच जनता पार्टीने झुकवले असून आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी आज आंदोलनाचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास याच्याशी चर्चा केली. चर्चे दरम्यान त्यांनी सीजेपीच्या मागण्या ठेवल्या. त्यामध्ये वांगचुक यांची तात्काळ सुटका करावी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, आणि आत्महत्या करणाऱ्या सर्व नीट (NEET) उमेदवारांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे. त्याबाबत नेतृत्वाशी बोलावे लागेल असे सांगून नड्डा यांनी काही वेळ मागितली.

जेपी नड्डा यांची धरणे आंदोलन संपवण्याची विनंती
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी ट्विट केले की, आंदोलकांनी सरकारसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. सकाळी ११:५० पासून चर्चा सुरू होती. ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. आंदोलकांनी दुपारी ४ वाजता एक लेखी निवेदन सादर केले. जेपी नड्डा यांनी धरणे आंदोलन संपवून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान भेट
सीजेपी आंदोलनाचा परिणाम दिसून येत आहे. दिल्लीत अमित शहा यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत धर्मेंद्र प्रधान यांची बैठक आणि चर्चा देखील सुरु असल्याची माहिती समोर आली. मात्र, नव्या माहितीनुसार अमित शाह यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल आणि किरण रिजिजू यांच्यासोबत बैठक सुरू असल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेच्या नंतर धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देणार का? याची उत्सुकता देखील आहे.






