Cockroch Janta Party: ‘कॉकरोच’ जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी दावा केला की, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकला ताब्यात घेतले आहे. त्यांनी विरोधी खासदारांना रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी आरोप केला की, पोलीस शांततापूर्ण आंदोलकांवर क्रूरपणे कारवाई करत आहेत, आणि त्यांना मारहाण करत आहेत. दरम्यान दिल्ली पोलिसांनी दीपके यांना ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून आपले उपोषण सोडले आहे.
शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी प्रस्तावित संसद मोर्चापूर्वी काही काळ गोधळाचे वातावरण होते. जंतर मंतरच्या परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मोर्चादरम्यान, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनजवळ पोहोचलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना पांगवण्यात आले.

दीपके यांनी उपोषण सोडले
‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विनंतीवरून आपले अनिश्चितकालीन उपोषण संपवले. सोनम वांगचुक सध्या सफदरजंग रुग्णालयात दाखल आहेत. १८ जुलै रोजी वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर दीपके यांनी उपोषण सुरू केले होते. त्यांच्या २१ दिवसांच्या उपोषणासाठी वैद्यकीय उपचारांची गरज होती. दरम्यान, सीजेपीचे प्रतिनिधी सौरभ दास आणि आशुतोष रांका सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना भेटण्यासाठी रवाना झाले. परीक्षा सुधारणांच्या आपल्या मागण्यांवर जोर देण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक जंतर मंतरवर जमले होते.
आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक
जंतर मंतरवरील आंदोलन आता आरबीआयकडे वळले आहे. पोलिसांनी तेथे सौम्य बळाचा वापर केला आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली असून तेथेही धरणे आंदोलन करत आहेत. नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही: गीतांजली वांगचुक
दिल्लीत इंटरनेट बंद करण्याची योजना आहे. हे सरकार देशाला जागतिक नेता बनवू शकत नाही, असे गीतांजली वांगचुक म्हणाल्या. माझा कोणत्याही सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही, म्हणूनच सोनम वांगचुक दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी मी न्यायालयात जात आहेत, असे गीतांजली वांगचुक म्हणाल्या.
तरुणांवर अश्रुधूर सोडणे थांबवा
सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे की, संसदेसमोर तरुणांवर अश्रुधूर सोडणे थांबवा. सरकारने दडपशाहीचा नव्हे, तर संवादाचा मार्ग निवडावा. आमच्या अकार्यक्षम शिक्षणमंत्र्यांना हटवून तरुणांचे ऐका, असे ते म्हणाले.






