होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जळगावात ही जोरदार निदर्शने

On: July 20, 2026 6:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज जळगावातील जागरूक नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी १२ ते दुपारी १ या वेळेत शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निदर्शनात विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील जाणकार तसेच विविध विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र शासनाने तातडीने लक्ष द्यावे, शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली.

निदर्शना दरम्यान “विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “शिक्षण व्यवस्था सुधारा”, “लोकशाहीचा सन्मान करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हाताळण्यात आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

उपस्थितांनी मत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांचे भविष्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण हा केवळ एखाद्या व्यक्तीचा किंवा पक्षाचा विषय नसून संपूर्ण समाजाच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहे. देशातील युवकांच्या अपेक्षा, शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि पर्यावरणीय प्रश्न यावर शासनाने सकारात्मक संवाद साधून तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

निदर्शनानंतर प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. जळगावातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी पक्षीय भेद विसरून एकत्र येत विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्नावर व्यक्त केलेली एकजूट ही लोकशाही मूल्यांवरील विश्वास आणि समाजाच्या जागरूकतेचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, गजानन मालपुरे, ॲड. जमील देशपांडे, प्रमोद पाटील,सौ. मंगला पाटील, जमील शेख, अशोक लाड वंजारी, एजाज मलिक, विराज कावडीया, विनोद शिंदे, निवृत्त प्राचार्य एस एस राणे, निवृत्त प्राचार्य राजकिशोर गुप्ता, शिवराम पाटील, किरण तळले, मुकुंदा रोटे, रिजवान जहागीरदार, ज्ञानेश्वर पाटील, संजू जमादार, सुनील माळी, ललित शर्मा, मुजीब पटेल, राजेंद्र निकम, चेतन पवार, अनंत परिहार, विष्णू धांडे व विविध सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी आदींचा मोठा सहभाग होता.

भारतीय लोकशाहीला सत्ताधाऱ्यांकडून धर्मसत्तेचा धोका: मुकूंद सपकाळे

भारतीय माणसाच्या जगण्याचे त्यांच्या उदरनिर्वाहाचे,सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, अश्या अनेक प्रश्नाकडे लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांना वेळ नसून भाकरीच्या प्रश्नांपेक्षा धर्म जाती जातीत विभागण्याचे काम सत्ताधारी करत असून भारतीय लोकशाहीला सत्ताधाऱ्यांकडून धर्मसत्तेचा फास आवळला जात असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले जळगाव जिल्हा संविधान प्रेमी नागरिक मंचाकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित प्रख्यात पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यावरील अन्याया संदर्भात निषेधात्मक निदर्शना प्रसंगी उपस्थितांसमोर बोलतांना व्यक्त केले.

या प्रसंगी मुकुंद नन्नवरे, कास्ट्राईब संघटनेचे रवींद्र तायडे, प्रा.प्रीतीलाल पवार,प्रा. किसन हिरोळे,चंद्रगुप्त सुरवाडे, जगदीश सपकाळे,श्रीकांत बाविस्कर,गोपाल भालेराव,सोमा भालेराव,महेंद्र केदार,वाल्मीक जाधव,संध्या तायडे,काजल वाघ, प्रतिभा घोडेस्वार,जयपाल धुरंधर,वैशाली झाल्टे अशोक कुमार गाडे, प्रल्हाद केदारे, विजय अहिरे, मनोज मनोहर कोचुरे हेमंत सुरवाडे नंदू सोनवणे संजना सुरवाडे रितिक बारेला, विनोद अढळके, अक्षय पाटील, संगीता पाटील, प्रणव उमराणे, वरध विसपुते, शुभम चव्हाण, वैष्णव पाटील, सचिन पाटील, शिवानी पाटील, अकलाब अमन शेख, हे सर सपकाळे डॉ. प्रकाश वानखेडे, गौतम वाकोडे, भारत सोनवणे, संजू जमादार , विजयकुमार मौर्य, चंद्रमणी सोनवणे ,अजित भालेराव, सुखदेव तायडे, बापूराव पानपाटील, सुनील सोनवणे, मनोहर लोखंडे, अशोक सपकाळे, भारत ससाने, ललित महिरे, सुरेन्द्र सुरवाडे, कोमल मोरे ,प्रकाश पाटील, प्रमोद झंवर, दिनकर ढाके, दत्तू सोनवणे, चंद्रकांत सपकाळे सुरेश तायडे रोहन आवचारे सुमित सोनवणे आकाश जाधव, आकाश कोळी, स्नेहा जयस्वाल साना पाटील, जाकीर शेख यांनी आंदोलनात सहभाग घेतला. भारताचे राष्ट्रपती महोदय यांच्या नावाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार निदर्शने केलीत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न: उपनेते गुलाबराव वाघ..सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ धरणगावला आंदोलन

हवामान स्थिती: पाऊस बघतोय परीक्षा, धरणाची पाणी पातळी घटली; जळगावात कधी होणार पाऊस ‘ते’जाणून घ्या

Amalner News: लोक वर्गणी- पाणीपट्टीवरील व्याजाचा विषय पुन्हा ऐरणीवर

अमृतमहोत्सव कार्यक्रम: एकनाथ खडसेंचे गिरीश महाजनांना निमंत्रण, जळगावमधील या दोघा दिग्गजांचे मनोमिलन होणार का?

चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला पाचोरा जोडण्याचा प्रयत्न हाणून पाडू: आ किशोर पाटील

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना जळगावमध्ये पाठिंबा; सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण निदर्शने

Leave a Comment