होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावचा महापौर आज होणार जाहीर; थोड्याच वेळात महापालिका सभागृहात विशेष सभा

On: February 7, 2026 4:27 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Mayor : जळगाव महानगरपालिकेच्या सतराव्या महापौराची औपचारिक घोषणा आज शुक्रवारी (दि. ६ फेब्रुवारी) करण्यात येणार असून, त्यासाठी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपच्या दीपमाला काळे या जळगावच्या नव्या प्रथम नागरिक होणार आहेत. त्या शहराच्या अर्थात महापालिकेच्या सतरा मजली इमारतीच्या सतराव्या महापौर ठरणार आहेत.

महापालिका सभागृहात विशेष सभा

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन केले आहे. या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती केली असून, सर्व प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी युतीकडून महापौरपदासाठी भाजपच्या दीपमाला काळे, तर उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे मनोज चौधरी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शिंदेसेनेचा पहिलाच उपमहापौर

मनोज चौधरी हे शिंदेसेनेचे पहिले उपमहापौर ठरणार आहेत. याआधी जयश्री महाजन शिवसेनेच्या महापौर, तर कुलभूषण पाटील उपमहापौर झाले होते. शिवसेना विभागल्यानंतर दोघे उद्धवसेनेत राहिले होते.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment