Nashik News: मार्च महिन्याच्या मध्यालाच उन्हाचा कडाका जाणवत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच नाशकात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीपिकाला मोठा फटका बसला असून साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पंचनामे सुरू असून हा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पावसाळा अजून तीन महिने लांब असतांना अवकाळी मात्र मार्चमध्येच येऊन धडकला. मंगळवारी आणि बुधवारी अशा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळीनं शेती पिके झोपली आहे. अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने ओढून घेतला आहे. महागडी खते, व बियाणे वापरून शेतीपिक घेणारा शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
काही तालुक्यात झालेल्या अवकाळीने जवळपास साडे सात हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं साडे चार हजार हेक्टरवर असलेल्या कांद्याच्या पिकाला फटका बसला आहे. नाशिक क्षेत्रात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून त्यातच उन्हाळी कांद्याचे पिका मोठया प्रमाणात लागवड करण्यात आले. हा या कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मालेगाव,सटाणा, नांदगाव, निफाड, सिन्नर या भागात अवकाळीनं हजेरी लावली. गेल्या वर्षी एप्रिलच्या अखेरच्या टप्यापासून अवकाळी बरसायला सुरुवात झाली होती. यंदा मात्र त्याआधीच बरसू लागला आहे. 63 गावांमधील 10 हजार 622 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागान वर्तवला आहे. 300 हेक्टरवरील मका , 720 हेक्टर वरील गहू, 51 हेक्टरवरील भाजीपाला ,109 हेक्टरवरील द्राक्ष, 1377 हेक्टरवरील डाळिंब याप्रमाणं पिकांचं नुकसान झालंय .अर्थात हा प्राथमिक अंदाज असून पंचनामे पूर्ण होतील तेव्हा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.





