Mumbai News: गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी महात्मा फुले जण आरोग्य योज़ना ही वरदान ठरलली आहे. या योजनेचा लाभ लाखो नागरिकांना मिळतो पण जे रुग्णालये या योजनेचा लाभ गरजू रुग्णाला देतनाही अशा रुग्णालयांना सरकारने निर्वाणीचा इशारा दिला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट रूग्णालये जर मोफत उपचार देत नसतील तर त्या रूग्णालयांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य अभिजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार देणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. या योजनेबाबत आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. मोफत आरोग्य सेवांचा लाभ गरजू नागरिकांना पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने देण्यासाठी शासन प्रभावीपणे काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सदस्य अतुल भातखळकर, संजय केळकर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.
या योजनेबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत रुग्ण आल्यावर त्याला या योजनेचा लाभ दत्त नाही, ही योजना आमच्याकडे नसल्याचे सांगून संबंधित रुग्णालये गरजू रुग्णांना उडवून लावतात. सरकारने याची दखल घेतल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. सर्व पाच लाखांचा खर्च या योजनेत समाविष्ट असतांना रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगितले जाते.











