होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

Nashik Muncipal Corporation: आरोग्यप्रश्नी नागरिकांचे महापालिकेत ठिय्या आंदोलन; मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी

On: April 2, 2026 2:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News:(Nashik Road) नाशिक रोड प्रभाग क्रमांक २२ मधील विहितगाव व बागुल नगर परिसरातील सांडपाणी, पिण्याच्या पाण्याची टंचाई व सुलभ शौचालयांच्या दुरावस्थेबाबत महापालिकेच्या नाशिक रोड विभागीय कार्यालयाबाहेर स्थानिक महिलांनी ठिय्या आंदोलन केले. प्रभाग २२ हा कायम समस्यांनी ग्रस्त राहिला आहे. पाणी, स्वच्छता, पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या परिसराला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी दिलेल्या निवेदनाचा आशय असा- विहितगाव व बागुल नगर परिसरामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. परिसरातील ड्रेनेज लाईन पूर्णपणे भरलेली असून सांडपाणी रस्त्यावर व घरांच्या आसपास साचत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून नागरिकांचे हाल होत आहेत. सुलभ शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्य हे  धोक्यात आले आहे.

ड्रेनेज लाईनची तत्काळ स्वच्छता व दुरूस्ती करावी, परिसरात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा. सुलभ शौचालयांची स्वच्छता, दुरूस्ती व देखभाल करावी. आवश्यक उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सलिम शेख, संगीता चव्हाण, सिध्दार्थ दोंदे, राधिका कसबे, अशोक बागुल, नसरिन शेख, हाजरा खान, सचिन भुसे आदींनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सद्या जळगावकरांना गारव्याचा दिलासा मात्र पुढील काळात उन्हाळा परीक्षा पाहणारा?

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

Leave a Comment