Mango News: आंब्याला फळांचा राजा म्हणून संबोधले जाते, गोड आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर असलेले आंबे खाल्ल्याने मन अधिक तृप्त होते, रत्नागिरी हापूस, देवगड, केसर, पायरी, आम्रपाली, रत्ना, सिंधू आणि तोतापुरी यांचा समावेश आहे. त्यामुळे ताजे, चवदार आणि पिकलेले आंबे हा अनुभव आनंददायी व मन तृप्त करणारा आहे.
यंदा वेळेवर पाऊस पडला नसल्याने त्याचा परिणाम आंब्यांवर होतो, आंबे त्या त्या काळात पिकवणे चांगले आहे, पावसाला उशीर झाला आंबे ही उशिराने पिकवले जातात. यंदा पाऊस वेळेवर झाला नसल्याने आंबे पिकण्यास उशीर झाला आहे, त्यात आंब्यांना असणारी मागणी लक्षात घेऊन त्याचा फायदा व्यापारी उचलतांना दिसतात. मग पैसे कमविण्यासाठी हवा मार्ग पत्करतात भले ही नागरिकांच्या जीवाशी खेळले जाते. जास्त नफा कमविण्यासाठी विषारी रसायने आणि औषधांचा वापर केला जातो. त्यात कार्बाइडचा देखील समावेश आहे. कुत्रिमरित्या आंबे पिकवण्यासाठी याचा वापर केला जातो. ज्यामुळे वेळे आधीच आंबे पिकले जातात
कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेले आंबे पूर्णपणे पिवळे आणि चमकदार दिसतात. तसेच, बाजारातून विकत घेतलेले आंबे पाण्याने भरलेल्या बादलीत किंवा भांड्यात ठेवा. जर आंबे पाण्यात तरंगत असतील, तर हे एक लक्षण आहे की ते रसायनांचा वापर करून पिकवले गेले आहेत. एक आंबा उचला आणि त्याच्या बाहेरील सालीवर हलक्या सुरकुत्या आहेत का ते पाहा. सुरकुत्या पडलेले आणि नैसर्गिकरित्या पिकलेले असतात चांगले असतात, परंतु हे खरे नाही, जर आंबा थोडा हिरवा किंवा कच्चा असेल आणि सुरकुतलेला असेल, तर हे लक्षण आहे की तो पिकण्यापूर्वीच तोडला गेला होता व तो कार्बाइडने पिकवला गेला होता.
आंबे कसे पिकवण्याची पद्धत
आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचे तुकडे टोकरीत किंवा पेटीत आजूबाजूला ठेवले जातात. बंदी असूनही, कॅल्शियम कार्बाइड बाजारात सहज उपलब्ध आहे. ते दगडासारखे दिसते. लोक त्याला चुनखडी असेही म्हणतात.







