Latest Weather News: जळगावचे तापमान वाढले आहे, दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामान असल्याने काहीसा दिलासा मिळे, अशी अपॆक्षा होती. मात्र सकाळी वातावरण ढगाळ असल्याने उष्णतेच्या झळा कमी होत्या, मात्र दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन हवामान कोरडे झाले, काही काळ ढगाळ हवामान असेल तरी उष्णता जाणवत होती. गेले दोन दिवस पारा जवळपास ४१ ते ४३ अंश सेल्सियस इतका होता. आज जळगावचे तापमान ४५ अंशाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.
पुणे हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगावचा पारा ४४.४ म्हणजेच ४५ अंशाकडे चालला आहे. सोमवारचे तापमान हे ४३.९ अंश सेल्सियस पर्यंत होते, आज त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे कडक उन्हापासून सध्या तरी जळगावकरांची सुटका नाही. वातावरणात सायंकाळपर्यंत उष्ण झळा जाणवत होत्या. त्यामुळे ढगाळ हवामानाचा थोडा दिलासा मिळाला असला तरी उष्मा नागरीकांची परीक्षा पहात आहे.

कोकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचत वाढ झाली आहे. दरम्यान १९ अणे २० मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे, तसेच विदर्भात १९ ते २५ मे पर्यंत पाच दिवसांचा येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेगगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३५.१,
सांताक्रूझ ३४.१,
अलीबाग ३५.०,
रत्नागिरी ३४.५,
पणजी (गोवा) ३४.३,
डहाणू ३६.३,
पुणे ४०.०,
लोहगाव ४१.८,
अहिल्यानगर ४१.९,
जळगाव ४४.४,
कोल्हापूर ३७.५,
महाबळेश्वर ३२.३,
मालेगाव ४३.०,
नाशिक ३९.९,
सांगली ४०.९,
सातारा ४०.५,
सोलापूर ४३.६,
धाराशिव ४२.१,
छत्रपती संभाजीनगर ४३.४,
परभणी ४४.१,
बीड ४३.३,
अकोला ४६.३,
अमरावती ४६.४,
बुलढाणा ४३.६,
चंद्रपूर ४३.८,
गोंदिया ४३.८,
नागपूर ४४.४,
वाशीम ४४.०,
वर्धा ४६.५,
यवतमाळ ४५.४







