होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावकरांनो पाणी जरा जपूनच वापरा!; हतनूर आणि वाघूर धरणात पाणीसाठा किती ‘ते’ जाणून घ्या

On: July 11, 2026 3:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव जिल्हाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. जिल्ह्यात अद्याप ही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या ऊर्ध्व तापी हतनूर धरणात आज ५३.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर गतवर्षी ३३.१८ टक्के होता. वाघूर धरणात ६०.२९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ६६.२५ इतका होता. धरणात त्यातुलनेत काहीसा समाधानकारक जलसाठा असला तरी येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही. तर, शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल.

हतनूर आणि वाघूरचा जलसाठा

शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या ऊर्ध्व तापी हतनूर धरणात आज ५३.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाघूर धरणात ६०.२९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ६६.२५ इतका होता. त्यात आता ६ टक्क्याची घट नोंदवली गेली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणारी आहे. शुक्रवार आणि शनिवारी दिवसभर ऊन पडले होते. त्यामुळे सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभर उकाडा जाणवत होता.

प्रकल्पात दमदार पावसाची गरज

दरम्यान हतनूर प्रकल्पात एकूण ३८८ (द.श.घ.मी.) इतका साथ असून मृतसाठा वगळता धरणात २५५ (द.श.घ.मी.) आजचा उपयुक्त साठा आहे. तर हतनूर धरणात प्रत्येक्षात २७० द.ल.घ.मी इतका तर त्यातील आजचा उपयुक्त १३७ (द.श.घ.मी.) साठा दिसत आहे. वाघूर धरण प्रकल्पात ३२५ (द.श.घ..मी.) तर मृतसाठा वगळता प्रकल्पात २४८ द.श.घ.मी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाघुरचा आजचा जलसाठा हा एकूण २२६.४४ तर त्यातील आजचा उपयुक्त पाणीसाठा १४९.६५ द.श.घ.मी. इतका आहे.

नाशिक आणि पुण्यामधील जलसाठा

राज्यातील सर्व धरणात ४३.४६ टक्केच पाणीसाठा आहे.गत वर्षी हा ५७ टक्के होता. राज्यातील मोठ्या प्रकळपात ६२.५७ टक्के आज ४६.९३ इतका निकामी झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नाशिकच्या गंगापूर धरणात ७१.४८ टक्के इतका समाधानकारक जलसाठा आहे. तर मागील वर्षी ५५.२३ इतका कमी होता.मुकणे धरणात ३४ टक्के तर दारणा धरणात ५४ टक्के जलसाठा आहे. पुण्यातील खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. मात्र इतर धरणात दमदार पावसाची आस कायम आहे.संभाजीनगर मध्ये जायकवाडी धरणात २८.६९ टक्के पाणीसाथ शिल्लक आहे.आपेगाव धरणात ४३ टक्के जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागांच्या आजच्या आकडेवारी वरून दिसते. अहिल्यानगर मध्ये भंडारदरा धरणात ५९.८९ टक्के तर मुळा २६.४५ आणि निळवंडे ३३.६३ टक्के इतका जलसाठा नोवनदवल आहे. त्यामुळे राज्यात मुंबई नाशिक, पुणे आणि सातारा या भागात मुसळधार पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये अद्यापही पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे, त्यामुळे बहुसंख्य भागात पावसाच्या पाण्याच्या गरज असून सध्या तरी हवामान विभागाने तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे.

पावसाचा अंदाज

दि ११ ते १३ जुलै दरम्यान कोकण आणि गोव्यातील अनेक ठिकाणी, विदर्भातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यताआहे दि. १४ जुलैला कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी, विदर्भातील अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.

हवामान विभागाचा इशारा

दि १० ते ११ जुलैदरम्यान कोणताही इशारा नाही. तर दि १२ ते १४ जुलै दरम्यान विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (ताशी ३०-४० किमी वेग) वादळ होण्याची दाट शक्यता.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment