होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आधी विनोद तावडे यांची भेट, त्यांनतर मातोश्रीवर गुफ्तगू; खडसेंचे चालले तरी काय?

On: July 11, 2026 4:43 PM
Follow Us:
---Advertisement---

Eknatha Khadse Update: सध्या राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडीसमोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जेष्ठ नेते आ.एकनाथ खडसे हे मोठे नाव आहे.ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल शुक्रवारी विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटीमुळे खडसे पुन्हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. या भेटीचे काही फोटो माध्यमांसमोर आले आहे. त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. एकनाथ खडसे भाजपात पुन्हा एकदा प्रवेश करणार अशी, चर्चा सुरू झाली आहे. तावडेंच्या भेटीनंतर, थेट त्यांनी मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने या भेटीने पुन्हा एकदा खडसे पुन्हा घरवापसी करतात का? किंवा त्यांनतर एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंच्या भेटीकरिता मातोश्रीवर दाखल झाल्याने पुन्हा एकदा वेगळी वाट धरतात का? या चर्चांना उधाण आले.

उद्धव ठाकरे यांची भेट

दरम्यान खासे यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. आ. खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी भाजपचे काम अनेक वर्ष केले प्रभावी विरोधीपक्ष नेता म्हणूनही त्याचे काम उल्लेखनीय राहिले आहे. तब्बल भाजपात त्यांनी ४० वर्ष राज्यात काम केले त्यावेळी भाजपाची फारशी ताकद नव्हती त्यावेळी नाथाभाऊ तत्कालीन सत्ताधाऱ्यांना उरून पुरत असे त्यामुळे नाथाभाऊ पुन्हा भाजपात यावे असे एक गटाला वाटत आहे. एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपा नेत्या रक्षा खडसे केंद्रात मंत्री म्हणून काम पहात आहे. यामुळे एकनाथ खडसे घरवापसी करणार का? आणि त्यातच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चाना आणखी उधाण आले. नेमके नाथाभाऊंचे चालले तरी काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. असे असले तरी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून खडसे याना मिळालेली आमदारकी भाजपकडून मिळेल का? अशी राजकीय विश्लेषकांना शंका आहे.

खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?

एकनाथ खडसे यांनी जवळपास चार दशकांहून अधिक काळ भाजप (BJP) मध्ये सक्रिय राहिल्यानंतर पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतरही त्यांच्या भाजपमधील पुनरागमनाच्या चर्चा वेळोवेळी होत राहिल्या. अलीकडेच विनोद तावडे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले होते. यामुळे खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने या चर्चांना वेगळेच वळण मिळाले आहे.

गाठीभेटींची चर्चा

दरम्यान राज्यात गाठीभेटींची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. खडसे यांनी सांगितले की, पुढील महिन्यात त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. आणि ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीचा कोणत्याही राजकीय घडामोडी किंवा पक्षप्रवेशाशी संबंध जोडणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment