PM-Kisan Samman nidhi Scheme : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासह त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक प्रमुख योजना म्हणजे पीएम-किसान सन्मान निधी. आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पीएम-किसान सन्मान निधी योजना
पीएम-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ₹६,००० तीन हप्त्यांमध्ये (प्रत्येकी ₹२,०००) थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करून आर्थिक मदत देते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेती आणि घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी आहे.
पात्रतेचे निकष
- ज्या शेतकरी कुटुंबांच्या नावावर जमीन नोंदीनुसार शेतीयोग्य जमीन आहे, ते पात्र आहेत.
- यामध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलांचा समावेश होतो, ज्यांच्या नावावर एकत्रितपणे जमीन आहे.
अपात्रतेचे निकष
- माजी आणि सध्याचे संवैधानिक पदधारक, मंत्री, खासदार, आमदार, किंवा महानगरपालिकेचे महापौर.
- सर्व सरकारी कर्मचारी (वर्ग-१, २, ३) आणि निवृत्त अधिकारी (वर्ग-४ सोडून).
- ₹10,000 पेक्षा जास्त मासिक पेन्शन असलेले निवृत्तीवेतनधारक (वर्ग-४ सोडून).
- मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरणारे व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबीय.
- डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांसारखे व्यावसायिक.
असा करा अर्ज
- pmkisan.gov.in या पोर्टलवर जा वा PM-KISAN मोबाइल ॲप डाउनलोड करा.
- ‘Farmers Corner’ मध्ये जाऊन ‘New Farmer Registration’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहिती (जसे की आधारशी जोडलेला बँक खाते क्रमांक, जमिनीचे तपशील) भरा.
- आधार-आधारित ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी पूर्ण करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. हा अर्ज राज्य सरकारच्या मंजुरीसाठी जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- बँक खाते (आधार लिंक केलेले).
- जमिनीच्या नोंदी (Land Records).
- मोबाइल नंबर (ओटीपीसाठी).
टीप : योजनेचे नियम आणि अनुदान वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे अर्जाच्या वेळी संबंधित पोर्टलवरील नवीनतम माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.










