होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

BMC Election Result : मुंबई महापौर निवडीसाठी राजधानीत खलबतं, मोदींचं मोठे विधान; म्हणाले…

On: January 18, 2026 10:23 AM
Follow Us:
---Advertisement---

BMC Election Result 2026 : संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल गेल्या दोन दिवसांपुर्वी लागला. या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. निकालानंतर आता महापौर निवडीच्या हलचालिंना वेग आला आहे. त्यामुळे मुंबईचा नवा महापौर कोण होणार, याबाबतच सस्पेन्स वाढला आहे. महापौर पदाबाबत राजधानी दिल्लीत खलबतं सुरु आहे. अशात आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या निकालावर मोठे भाष्य केले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाने एकत्र येत पूर्ण लावली होती. तर दुसरीकडे मनसे आणि उद्धव ठाकरे यांनीही ऐतिहासिक युती करून मराठी अस्मितेच्या माध्यमातून वातावरण तापवले होते. चुरशीच्या अशा या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापौर निवड प्रक्रियेकडे. अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक ताज लँड्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहेत.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?


नरेंद्र मोदी आसाम राज्याच्या दौऱ्यावर आहे. येथील काझीरंगातील एका सभेला संबोधित करतांना पंतप्रधान मोदी यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर थेट भाष्य केले. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच संपूर्ण देशात भाजपा हा सर्वांचा आवडता पक्ष म्हणून समोर येत आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून लोकांचा भाजपावरील विश्वास वाढत आहे. हा विश्वास मतदानातून व्यक्त होत आहे. नुकेच बिहारमध्ये निवडणुका झाल्या. तिथे लोकांनी भाजपाला विक्रमी मतं दिली.

तसेच दोन दिवसांअगोदर महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत महापौर आणि नगरसेवक पदाच्या निवडणुका झाल्या. मुंबई हे जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. मुंबईतही जनतेने भाजपाला पसंती देत ऐतिहासिक आणि विक्रमी मतं दिली. महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरातील मतदारांनी भाजपालाच संधी दिली आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment