Latest Weather News: विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवत आहे,कधी ऊन तर कधी ढगाळ हवामान तरी वातावरणात उष्मा कायम आहे. जळगावचे तापमान गेल्या दोन दिवसांपासून ४२ अंशाच्या वर किंवा आसपास बघायला मिळत होते. शनिवारी कमाल तापमान ४२ अंश घसरले होते, तरीही वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता, आज दिवसभर अधूनमधून ढगाळ हवामान होते, पण उष्णतेची तीव्रता कायम होती, त्यामुळे दुपारी उन्हाचे चटके बसत नसले तरी वातावरणात ऊष्मा जाणवला. तरी आज जळगावचे तापमान हे ४३.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे, त्यामुळे ढगाळ हवामानाने काहीसा दिलासा दिला, तरी उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. कोकणात सिधुदुर्ग जिल्हयातील देवगढ येथे १० से.मी तर कणकवलीत ७ से मी पाऊस झाला आहे.
कोकण-गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे, कोकणात ७ ते ८ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तापमान सामान्यासह अधिक आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ; तर मराठवाड्यात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसत आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सियसमध्ये
मुंबई ३४.७
नागपूर ४५.०
पुणे ३४.७
छत्रपती संभाजीनगर ४०.७
नाशिक ३५.५
कोल्हापूर ३४.६
सोलापूर ४०.०
सातारा ३६.४
सांगली ३६.८
मालेगाव ४१.६
जळगाव ४३.६
परभणी ४२.१
अकोला ४४.९
पणजी ३४.८







