Jalgaon News: इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने एक मोठा दिलासादायक बदल केला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना दोन दोन प्रमाणपत्र सांभाळण्याची गरज भासणार नाही, त्यांना एकाच ठिकाणी गुण आणि प्रमाणपत्र उपलब्ध होईल. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. या वर्षापासून इयत्ता १० वी (SSC) आणि १२ वी (HSC) च्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक (Marksheet) आणि प्रमाणपत्र (Certificate) स्वतंत्र न देता, ते ‘एकत्रित’ (Consolidated) स्वरूपात देण्यात येणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, सर्व विभागीय मंडळांना या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमात बदल
केवळ गुणपत्रक एकत्र होणार नाही, तर विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमातही बदल करण्यात आला आहे. आता गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव ‘First Name (विद्यार्थ्याचे नाव), Father Name (वडिलांचे नाव) आणि Surname (आडनाव)’ या क्रमाने छापले जाणार आहे. या बदलामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या नावाचा क्रम तपासून घेणे आवश्यक आहे. या नावाने कर्म दिल्याने पुढील शैक्षणिक प्रवेश घेतांना नावातील संभ्रम दूर होणार आहे.
याचा विद्यार्थ्याना फायदा होणार बऱ्याचदा विद्यार्थी हे गुणपत्रक घेतल्यावर ते तपासात नाही, किंवा गुणपत्रक घेतल्यावर पास आऊटचे प्रमाणपत्र घेत नाही, अनेकदा ते विसरून जातात प्रमाणपत्राला फारसे गाभाऱ्याने घेत नाही गुणपत्रकेवर पुढील शैक्षणिक प्रवेश मिळत असल्याने त्याकडे दुलश करतात. तसेच अनेकदा गुण पत्रक आणि प्रमाणपत्रक याच्या नावात काही तफावत असते ते उशीरा लक्षात आल्यावर शेक्षणिक अडचणी येतात त्यामुळे प्रवेशाला पुढील शिक्षणात अडथळे निर्मण झाल्याने काल अपव्या होते. त्या अनुषंगाने बोर्डाने घेतलेला निर्णय चगचागला असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे.









