होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पर्यावरण संवर्धनाचा निर्धार: जळगावात ‌‘एक पेड़ माँ के नाम‌’ उपक्रमातून दिला हरित संदेश

On: July 21, 2026 4:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: भारतीय जनता पक्ष, जळगाव महानगर विश्वकर्मा योजना सेलच्या वतीने तसेच महेश वर्मा यांच्या सहकार्याने त्यांच्या मातोश्री स्व. पद्माबाई वर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‌‘एक पेड़ माँ के नाम‌’ या अभियानांतर्गत गजानन कॉलनी उद्यान (मधुबन अपार्टमेंटजवळ) येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाला शहराचे आ. राजूमामा भोळे, भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, भाजप विश्वकर्मा योजना सेलचे जिल्हा महानगराध्यक्ष संजय विसपुते यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या सावली व फळझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली.

यावेळी बोलताना मान्यवरांनी ‌‘एक पेड़ माँ के नाम‌’ ही संकल्पना केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या स्मरणार्थ किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली, तर पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला मोठी चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाढते प्रदूषण, हवामानातील बदल, तापमानवाढ आणि वृक्षतोड यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. आज लावलेले प्रत्येक झाड भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध निसर्गाचा अमूल्य ठेवा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment