होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

LPG Crisis: होर्मूझच्या खाडीत गोळीबार ‘ही’ दोन भारतीय जहाजे परतली माघारी, एक बुधवारी भारतात येणार…

On: April 20, 2026 3:18 PM
Follow Us:
---Advertisement---

LPG Shortage: अमेरिका आणि इराण यांच्यातील तुतू- मैमै संपण्याचे नाव घेईना, त्यामुळे होर्मूझ खाडीतील जहाजांच्या वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. हा तिढा सुटत नसल्याने तेल आणि व्यापारी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशियासह जगभरात तेल आणि गॅसचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान भारतीय ध्वजधारी कच्चे तेल वाहून नेणारे जहाज ‘देश गरिमा’ने 18 एप्रिल 2026 रोजी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली. या जहाजावर 31 भारतीय खलाशी असून ते 22 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे. (LPG Shortage)

मागील 24 तासांत, व्हीएलसीसी सम्नार हेराड आणि बल्क कॅरियर जग अर्णव हे या दोन भारतीय जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना गोळीबाराची घटना नोंदवली, त्यानंतर ही जहाजे पर्शियन आखातात परतली. कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची नोंद नाही. मात्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काल नवी दिल्ली येथील इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकाचे राजदूत यांना परराष्ट्र सचिवांसोबत बैठकीसाठी बोलावले होते. बैठकीदरम्यान, परराष्ट्र सचिवांनी काल सकाळी हॉर्मुझ सामुद्रधुनीत दोन भारतीय ध्वजधारी जहाजांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत भारताची तीव्र चिंता व्यक्त केली. व्यापारी जहाजे आणि समुद्री कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला भारत किती महत्त्व देतो याची त्यांनी दखल घेतली. (LPG Shortage)

या गंभीर गोळीबाराच्या घटनेबाबत चिंता व्यक्त करत परराष्ट्र सचिवांनी राजदूतांना भारताचे मत इराणमधील संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आणि भारताकडे येणाऱ्या जहाजांच्या होर्मूझ सामुद्रधुनीतून वाहतुकीची प्रक्रिया लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले. सर्व भारतीय समुद्री कर्मचारी सुरक्षित आहेत. ही परिस्थिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संबंधित भागधारकांच्या समन्वयाने सतत बारकाईने पाहिली जात आहे. असल्याचे पेट्रिलियम मंत्रालयाने सांगितले आहे. (LPG Shortage)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment