होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वरिष्ठ वकील झाल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश; राष्ट्रपतींनी ‘या” पाच न्यायाधीशांची केली नियुक्ती

On: June 1, 2026 4:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: भारताच्या राष्ट्रपती मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पाच व्यक्तीचे नियुक्ती केली आहे, त्यात पंजाब-हरियाणा, मुंबई, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसह एका वरिष्ठ अधिवक्त्याचा समावेश आहे. सरकारच्या वतीने आज काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 124 च्या खंड (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच व्यक्तींची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्ती केली आहे.

विशेषतः त्यामध्ये जेष्ठ अधिवक्त्या (वरिष्ठ वकील) श्रीमती वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची ही वर्णी लागली आहे. या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयाला पाच नवीन न्यायाधीश मिळाले आहे; राष्ट्रपतींकडून नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती, भारत सरकारचे संयुक्त सचिव जगन्नाथ श्रीनिवासन यांनी परिपत्रक जारी करून दिली आहे.

दरम्यान यामध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश श्री चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा, जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण पल्ली आणि ज्येष्ठ अधिवक्त्या (वरिष्ठ वकील) श्रीमती वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment