होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावकर उकाड्याने बेजार; जिल्ह्याचे तापमान वाढले, किती ‘ते’ जाणून घ्या!

On: June 2, 2026 7:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे, नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला असला तरी वातावरणात उकाडा कायम आहे, सोमवारी सायंकाळी पावसाच्या सारी पडल्याने जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला मात्र मंगळवारी सकाळपासून उकाडा जाणवत आहे, सोमवारी तापमान ३९ अंश सेल्सियस होते आज जळगावचे तापमान वाढले असून पारा ४१ अंश झाला आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत वातावरणात उष्मा जाणवत होता. हवामान विभागाने २ जूनला पावसाचा अंदाज दिला नसला तरी मध्य महाराष्ट्रात २ ते ६ जूनला येलो अलर्ट दिला असून वादळीवारा आणि तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी, कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली; विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. हवामान विभागाने कोकणात २ ते ८ जून दरम्यान येलो अलर्ट दिला आहे. तर २ ते ६ जून मध्य महारष्ट्रात येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात २ ते ४ आणि विदर्भात २ ते ५ जून दरम्यान येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३६.०,
सांताक्रूझ ३४.९,
अलीबाग ३६.०,
रत्नागिरी ३६.८,
पणजी (गोवा) ३५.६,
डहाणू ३७.४,
पुणे ३८.१,
लोहगाव ३७.४,
अहिल्यानगर ३९.०,
जळगाव ४१.०,
कोल्हापूर ३७.३,
महाबळेश्वर ३०.१,
मालेगाव ४१.४,
नाशिक ३७.१,
सांगली ३९.२,
सातारा ३७.८
सोलापूर ४०.८,
धाराशिव ३९.१,
छत्रपती संभाजीनगर ३९.३,
परभणी ४०.५,
नांदेड ३९.४,
बीड ४०.३,
अकोला ४२.५,
अमरावती ४१.२,
बुलढाणा ४०.०,
ब्रह्मपुरी ४३.३,
चंद्रपूर ४१.२,
गोंददया ४१.०,
नागपूर ४०.८,
वाशीम ४०.४,
वर्धा ४१.९,
यवतमाळ ४२.०.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment