Latest Cricket News: राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीची शनिवारी बैठक होणार आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका तसेच आशियाई खेळांसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार असल्याने या दौऱयासाठी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, सध्याचा फॉर्म बघता सूर्यकुमार यादवच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याला कायम ठेवले जाईल की संघ नवीन कर्णधाराला संधी देईल? हे बघावे लागणार आहे. (Cricket News)
शनिवारी निवड समिती बैठक
अजित आगरकर यांच्या उपस्थितीत निवड समिती भारतीय टी-२० दौऱ्यासाठी संघ निवड करणार आहे.त्यातच संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आता हे जवळपास निश्चित झाले आहे की श्रेयस अय्यर (Shreyas Iyar) हा सूर्यकुमार यादवची जागा टी-२० कर्णधार म्हणून घेईल. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती आयर्लंड आणि इंग्लंडच्या आगामी दौऱ्यांसाठी आणि जपानमधील आशियाई खेळांसाठी संघाची निवडीसाठी शनिवारी बैठक घेणार आहे. भारत २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे, तर १ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळविले जाणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या निवडीवर प्रश्नचिन्ह (Surykumar Yadhav)
दरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपान येथे आशियाई खेळ होणार आहेत. आयोजकांनी लवकर अंतिम मुदत निश्चित केल्यामुळे भारतीय संघाची घोषणा लवकर केली जाईल असे मानले जात आहे. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा टी-२० संघाचा नवीन उपकर्णधार असेल, तर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही पहिल्यांदाच वरिष्ठ संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तसेच सूर्यकुमार कर्णधारपद गमविण्याची शक्यता आहे, सद्याचा फॉर्म बघितला तर संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारच्या कर्णधारपदाखाली भारताने यावर्षी टी-२० विश्वचषक विजेतेपद राखले, परंतु तो गेल्या अनेक महिन्यांपासून फॉर्ममध्ये नाही. (National Selection committee)
श्रेयसचे आयपीएलची कामगिरी सरस (Shreyas Iyar)
श्रेयसने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार असतांना दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांना अंतिम फेरीत पोहोचवले आहे. २०२४ मध्ये, त्याच्या कर्णधारपदाखाली कोलकाता नाईट रायडरने विजेतेपद पटकावले होते. श्रेयस हा एकमेव कर्णधार आहे, ज्याने तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएलच्या अंतिम फेरीत नेले आहे, त्याच्या नेतृत्वावर विश्वास वाढला आहे. तसेच कर्णधारपदाची जबाबदारी असूनही श्रेयसच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही, या वर्षी त्याने आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी केली.









