Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana : सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात काही प्रमुख योजना आहेत, ज्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यात एक प्रमुख योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश प्रत्येक शेताला पाणी पुरवणे आहे. या योनजेतंर्गत शेतकऱ्यांना ट्यूबवेल, कालवे आणि ठिबक सिंचन प्रणाली यासह सिंचनासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जातात. यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक पिके घेण्यास मदत होते. सिंचन सुविधांमध्ये सुधारणा, जलसंधारणाचे उपाय, कोरड्या भागातही शेती शक्य असे फायदे आहेत.
असा करा अर्ज
- mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- नवीन शेतकरी असाल तर नोंदणी करा किंवा लॉगिन करा.
- सेवा/योजनांच्या यादीतून ‘कृषी’ (Agriculture) विभाग निवडा.
- ‘सूक्ष्म सिंचन’ (Micro Irrigation) किंवा ‘ठिबक/तुषार सिंचन’ (Drip/Sprinkler Irrigation) या घटकाची निवड करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
- आवश्यक कागदपत्रे (जसे की आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो) स्कॅन करून अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा (जमिनीच्या मालकीचा पुरावा)
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अनुदानाचे स्वरूप (उदा. ठिबक/तुषार)
- सीमांत, लहान शेतकरी, SC/ST, महिला: एकूण खर्चाच्या ९०% (किंवा प्रति हेक्टर ₹ २५,०००/- यापैकी जे कमी असेल ते).
- मोठे शेतकरी/संस्था: एकूण खर्चाच्या ७०% (किंवा प्रति हेक्टर ₹ २५,०००/- यापैकी जे कमी असेल ते).
टीप : योजनेचे नियम आणि अनुदान वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे अर्जाच्या वेळी संबंधित पोर्टलवरील नवीनतम माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.










