होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सद्या जळगावकरांना गारव्याचा दिलासा मात्र पुढील काळात उन्हाळा परीक्षा पाहणारा?

On: April 7, 2026 3:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: अवकाळी पावसाने १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान गारपीट आणि वादळी पावसाने धिगांना घातला. या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले,काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र दोन दिवसानंतर आता वातावरणात उष्णता जाणवू लागला आहे. त्यामुळे आता उन्हाचा कडाका वाढला आहे, मागील वर्षी याचा काळात तापमानाने ४० शी पार केली होती. सध्या वातावरण ढगाळ असले तरी एप्रिलच्या मध्यापासून तापमानाचा पारा ४० पार करण्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा नागरिकांची परीक्षा पाहणारा ठरणार आहे. गेले चार दिवस वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे वातावरणात उष्णमा जाणवला नाही, मात्र येणारा पुढील आठवडा हा आव्हानात्मक राहणार आहे.

दरम्यान मार्चच्या अखेरच्या आठवड्यात उष्णतेचा पारा ३५ ते ४० अंशापर्यंत होता. उन्ह सावलीचा खेळ सुरू असतांनाच दि.३० मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संपूर्ण आठवडा वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याप्रमाणे ३० ते ३१ मार्च दरम्यान किरकोळ पाऊस झाला. मात्र त्यानंतर दि. १ ते ४ एप्रिल दरम्यान पावसाने खान्देश भागात धिंगाणा घातला. त्यामुळे काही ठिकाणी पिकांचे आणि मालमत्तांचे झाले मात्र काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला, आता हळूहळू सूर्य देवता आग ओकण्यास सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहे,

वातावरणातील उष्मा वाढला आहे. आगामी काळात वातावरण कसे असेल याची झलक आताच दिसत आहे. मागील वर्षी याच दरम्यान पारा ४० वर होता. सध्या ३६ ते ४० दरम्यान झुलणारा पारा पुढील आठवड्यात ४० शी पार करणार असल्याचा अंदाज हवामान आणि कृषीक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागणार आहे, दुपारी शकतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे लागणार आहे.

दुपारी काम असेल तरच बाहेर पडा, कारण पारा ४० अंशावर गेला की नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागतील, उन्हामुळे रस्ते सामसूम असणार, ७ ते १० एप्रिल पर्यत वातावरण ढगाळ आणि गारवा अनुभवायला मिळेल मात्र जसा एप्रिल महिनाच्या मध्याला उन्हाचा कडाका आणखी वाढेल आणि पारा ४० ओलांडून पुढे जाईल मालेगाव आणि जळगावच्या नागरिकांना उष्णतेच्या झळा जाणवू लागतील. त्यामुळे उन्हाळा असहाय्य होईल.

दरम्यान उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक आता टोपी, रुमाल आणि इतर साधनांचा वापर करत आहेत, सद्या त्याचे प्रमाण कमी असेल तरी जसा कडाका वाढेल तसे हळूहळू त्याचा वापर नियमित करतांना नागरिक दिसून येतील.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment