होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशकात विकासाचे नाव, वृक्षांवर घाव! समाज माध्यमांतून ही होतेय वृक्षतोडीवर टीका!

On: April 11, 2026 12:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: काही महिन्यांपूर्वी तपोवनातील शेकडो वृक्षतोडीचा मुद्दा गाजला होता, तो शांत होत नाही, तोच नाशिकच्या गंगापूर रोडवरील १०० ते १५० वर्ष जुनी झाडे तोडल्याने वृक्षप्रेमी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या वृक्षतोडी विरोधात हरित लवादाकडे नाशिककरांनी दाद मागितली होती, लवादाने वृक्षतोडण्यावर बंदी आणली आहे. गंगापूररोडवरील वृक्ष वाचविण्यासाठी नाशिककर साखळी पद्धतीने आपला निषेध नोंदवत आहे. दरम्यान समाज माध्यमातून वृक्षतोडीचा प्रश्न गाजत आहे. टेंडर आणि टक्केवारीत गुरफटून न जाता शहराच्या शाश्वत विकासावर लोक प्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नाशिककर करत आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याकडे शासन प्रशासनाचे लक्ष लागून आहे. संपूर्ण शहरात कुंभमेळ्याची कामे सुरू आहे. २०२६-२७ मध्ये हा मेळा भरणार आहे. मात्र विकास आणि कुंभमेळ्याचे नाव पुढे करून मोठया प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. असा आरोप वृक्षप्रेमी आणि नागरिकांनी केला आहे. तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न असाच गाजला होता. त्यावेळी संत- महंतांनी वृक्षतोड न करता हरित कुंभाची सूचना केली होती. गंगापूररोड वृक्षतोड प्रकरण सोशल माध्यमात ही गाजत आहे. वेगवेगळे हॅशटॅग वापरून नागरिक जनजागृती करत आहे. सेव्ह नाशिक ट्री, सेव्ह नाशिक, एन्वायरमेंट मॅटर्स, आदिचा समावेश आहे. (Save nashik tress, savenashik, environmentmatters) त्यावेळी तोडलेली वृक्ष दूसरीकडे लागवड करण्यात येणार असल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

ऐतिहासिक वारशाचा ऱ्हास

नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली ७५ ते १०० वर्षे जुनी वटवृक्ष, पिंपळ, उंबर, आणि कडुनिंबाची झाडे तोडली जात आहेत. हे विकास नसून सत्तेचा दुरुपयोग आणि शहराचे सौंदर्य नष्ट करणे आहे. १३ वर्षांपूर्वी त्र्यंबक सिग्नल ते त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील झाडेही अशाच प्रकारे ‘विकासा’च्या नावाखाली तोडली गेली होती. शास्त्रीय छाटणी करणे झाडे, झाडे पूर्णपणे न तोडता २० ते २५ फूट उंचीपर्यंत त्यांच्या फांद्या छाटाव्यात, जेणेकरून वाहतुकीस अडथळा येणार नाही आणि वृक्षही जिवंत राहतील.वटवृक्षांचे पुनरोपण:वटवृक्षाच्या फांद्यांपासून नवीन झाडे तयार होऊ शकतात. या फांद्यांचे नदीकाठी किंवा इतरत्र नियोजनबद्ध लागवड केल्यास नाशिकमध्ये ‘लहान जंगल’ उभे राहील.

मागील कुंभमेळ्यात निस्वार्थी सेवा करूनही (स्वच्छता अभियान, वृक्षारोपण) केवळ राजकारण आणि ओळखीअभावी आमच्या संस्थेच्या कार्याची दखल घेतली गेली नाही, अशी खंत  ‘मार्क मार्शल आर्ट्स नाशिक – कौन्सिल फॉर एन्व्हायर्नमेंट एनरिचमेंट अँड प्रिझर्वेशन’चे संस्थापक आणि भारत सरकारचे राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद आरिफ खान यांनी व्यक्त केली. २०२६-२७ च्या कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीचा तीव्र निषेध त्यांनी केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment