होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Sangrampur News : 20 वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा; जुन्या आठवणींना दिला उजाळा‎

On: February 8, 2026 4:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Sangrampur News : संग्रामपूर शहरातील पीएम जि.प. विद्यालयात नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा पार पडला. विशेषतः तब्बल 20 वर्षांच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीरंग ढोकणे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थिनी तथा प्रभारी मुख्याध्यापिका चित्राताई राजनकर उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रगीत, सरस्वती माता व संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचे स्वागत-सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थी अनिलसिंग चव्हाण, अतुल राऊत, सतीश घाटे, श्याम उमरकर, हरीश मारोठे, विशाल वानखडे, प्रदीप बोदडे, देवलाल भड यांनी प्रास्ताविकेतून 2005-2006 मधील 10वीच्या वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच इतर विद्यार्थी, विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेला स्पीकर भेट देण्यात आला. प्रसंगी शिक्षक मोरणकर, राठोड, इंगळे, मारोडे, मेहरकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका , कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, समाधान व्यक्त केले. सुत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रवीण वानखडे यांनी केले. आभार विजय आकोटकर, अंजली अजने, अश्विनी इंगळे यांनी मानले.

(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.) 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला पालखी करणार प्रस्थान

Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणूक; अपक्ष उमेदवार महायुतीचे गणित बिघडवणार, 16 उमेदवार रिंगणात

गुटखा माफियांचे धाबे दणाणले, राज्यातील कारवाईत ‘इतक्या’ जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे- पिंपरी चिंचवड दारू भेसळप्रकरणी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

11th Admission: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार; विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज

Leave a Comment