होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

Shahid Divas शहीद दिन: देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसमोर नतमस्तक होण्याचा दिवस…

On: March 23, 2026 12:29 PM
Follow Us:
---Advertisement---

Shahid Divas शहीद दिन: देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसमोर नतमस्तक होण्याचा दिवस…Shahid Divas: भारत स्वतंत्र झाला, त्यामागे अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आहे. स्वतंत्र चळवळीत ज्या हुतात्म्यांनी मरण पत्करले पण आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्यशी तडजोड केली नाही, अशा भूमिपुत्रांना आदरांजली वाहण्याचा दिन, भारतात हुतात्मा दिन प्रामुख्याने ३० जानेवारी आणि २३ मार्च रोजी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो. ३० जानेवारी ही महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे, तर २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु या तिघांना फाशी देण्यात आली होती. हा दिवस राष्ट्राप्रती त्यांचे शौर्य आणि देशभक्तीचे स्मरण करुन देतो. या दिवसाचे महत्त्व तरुणांना खास करून त्यानंतरच्या पिढ्यांना कळावे यासाठी स्मरण केला जातो.

आम्ही मरण पत्करू पण आमचे स्वातंत्र्य तुमच्या स्वाधीन करणार नाही, असे ज्वाजल्य देशप्रेमी आणि देशभक्तांना आपण कधी विसरू शकणार नाही, लाहोर तुरुंगात ब्रिटिशांनी भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरु यांना फाशी दिली होती. हा दिवस तरुणांसाठी देशभक्तीची एक मोठी प्रेरणा देणारा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात वीरांचे स्मरण करणे आणि तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे हा या दिवसा मागील उद्देश आहे. देशभरात, विशेषतः पंजाबमधील फिरोजपूर येथे ज्या ठिकाणी शहीद स्मारक आहे, तेथे विशेष समारंभ आणि श्रद्धांजली सभा घेतली जाते. तिसरा शहीद दिन भारतात २१ ऑक्टोबर देश आणि राज्यस्तरावर वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.

१९२८ मध्ये, भगतसिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याला ठार केले, जो लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्ज करुन त्यांच्या मृत्यूला जबाबदार होता. त्यावेळी ही घटना संपूर्ण देशाभर गाजली. ही घटना पुढे स्वातंत्र्य चळवळीला नवीन ऊर्जा देण्यास कारणीभूत ठरली. यानंतर १९२९मध्ये भगतसिंह यांनी केंद्रीय विधानसभेत ” इंकलाब झिंदाबाद”च्या घोषणा देत कुणालाही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत ज्या ठिकाणी कोणी नाही अशा जागेत एक बॉम्ब फेकला. त्यांचा उद्देश एकच इंग्रज सरकारच्या अन्याविरूद्ध देशवासियांना एक संदेश पोहचावयचा होता आणि इंग्रजांना आम्ही तुमच्या अन्यायाला सहन करणार नाही असा कठोर संदेश द्यायचा होता. गुंग्या आणि बहिऱ्या सरकारला जागे करण्यासाठी हा धमका होता. न्यायालयातही त्याने देशभक्तीचा संदेश आपल्या विचारांतून दिला.

त्याच्या धाडसाची चर्चा देशभरात होऊ लागली. युवकांना प्रेरणा मिळू लागल्याने तरुण मोठया प्रमाणात स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाले. या क्रांतिकारकांना मिळणारा पाठिंबा बघून मात्र ब्रिटिश सरकार हादरले. देशभरात त्यांनी स्वातंत्र्याची एक ऊर्जा त्यांनी निर्माण केली होती, अखेर इंग्रज सरकारने २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना लाहौर तुरुंगात फाशी दिली, त्यावेळची ही घटना भारतीय इतिहासात आजारामर झाली. त्यावेळी भगतसिंह केवळ २३ वर्षांचा होता, परंतु त्याचे विचार, धैर्य आणि निश्चय हा त्याकाळातील अनेक नेत्यांपैकी कमी नव्हता. स्वातंत्र्य समर्पणाची भावना त्यावेळी लोकांमध्ये निर्माण होण्यास ही घटना कारणीभूत ठरली. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे आशा अनेक विरांचे योगदान आहे.

भारतातील दुसरा शहीद ३० जानेवारी १९४८ रोजी साजरा होतो. या दिवशी गांधीजींची नवी दिल्लीच्या बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली होती. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ते कोणताच भारतीय विसरू शकत नाही, एखादी लढाई निशस्त्रपणे देखिल लढली जाऊ शकते. हा संदेश संपुर्ण जगाला दिला. जीवनात नैतिकमूल्य पाळून साधे जीवन जगता येते. या दिवशी गांधीजींना संपुर्ण देश आदरांजली वाहत असतो. सत्य आणि अहिंसेचे महत्त्व त्यांच्यामुळे आपल्याला पटले. अशा थोर पित्यासमोर नतमस्तक होण्याचा हा दिवस मानला जातो. २१ ऑक्टोबर हा तिसरा शहीद दिवस, देशासाठी अंतर्गत आणि बाह्य शक्तींशी लढा देतांना शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा दिवस म्हणून ही साजरा केला जातो.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment