होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातून १९८ कर्मचाऱ्यांना काढले बाहेर; आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दिला ‘हा’ इशारा!

On: April 5, 2026 4:28 PM
Follow Us:
---Advertisement---

USA Israel War On Iran: बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पातून रशियाची स्टेट अणुऊर्जा कंपनी ‘रोसतोम’ (Rosatom) यांच्या हवाल्याने रशियन माध्यमांनी वृत्त दिले आहे की, अपघाताचा धोका वाढल्याने येथील १९८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे. शनिवारी रशियाने आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल यांना तात्पुरता युद्धविराम करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. येथील परिसराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, दरम्यान या हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिका- इस्रायल यांनी शनिवारी इराणच्या बुशेहर न्यूक्लियर प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे रेडिएशनचा धोका निर्माण निर्माण होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात एका जणांचा मृत्यू झाल्याचे आंतराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने सांगितले. या हल्ल्यात अणुऊर्जा प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान तूर्तास कोणताच धोका नसल्याचे संस्थने म्हटले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था प्रमुख राफेल मारियानो यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात कोणताही हल्ला होऊ नये, यात केवळ रिएक्टरच नव्हे तर इतर महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा असू शकतात. त्यामुळे अशा परिसरात कोणताही हल्ला धोका निर्माण करू शकतो, त्यामुळे सर्व पक्षांनी संयम ठेवण्याचे आवाहन ग्रोसी यांनी केले आहे.तसेच अणुऊर्जा प्रकल्पाचे रेडिएशन गल्फ परिसरात पसरण्याची शक्यता इराणचे विदेशमंत्री अब्बास अरागची यांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांचे अल्टिमेटम

अमेरिका आणि इस्रायलने इराण वरील हल्ले सुरूच ठेवले असून होर्मूझ सामुद्रधुनी मोकळी करण्यासाठी ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. अन्यथा टाचे वाईट परिणाम भोगण्यास तयार राहा असा इशारा दिला ट्रम्प यांनी १० दिवसात समझोता केला नाही तर इराणी अधिकाऱ्यांना नरकात पाठवण्याचा इशारा दिला तर इराण लष्कराने देखील प्रतिउत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान अमेरिकेचे एफ ३५ हे पाचव्या पिढीतले लढाऊ विमान पाडल्याचा दावा इराणने केला आहे. युद्धग्रस्त भागात या विमानाच्या पायलटचा शोध दोन अमेरिकन हेलिकॉप्टर घेता असल्याचा दावा इराणने केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment