Latest Weather News: राज्यात उष्णतेचा दाह कमी झाला आहे, परंतु वातावरणात उकाडा अद्यापही जाणवत आहे. दिवसभर गरम झळा सोसाव्या लागत आहे. अधूनमधून ढगाळ हवामान असले तरी उकाडा जाणवत आहे. जळगाव मध्ये तापमान ४२.५ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने ४२ अंश किंवा त्यावर असल्याने वातावरणात उष्मा जाणवतो. तसेच दिवसभर उकाड्याने नागरिक हैराण झाले असून घामाच्या धारा वाहत आहेत. दि. ३० मे ते ५ जून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाडा येथे ही येलो अलर्ट दिला आहे. सोसाट्याचा वारा, उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४५.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. तर सर्वात कमी तापमान हे महाबळेश्वर येथे २९.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. तसेच तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ दिसून येत आहे. कोकण गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे, तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३६.०,
सांताक्रूझ ३५.२,
अलिबाग ३६.८,
रत्नागिरी ३५.४,
पणजी (गोवा) ३४.८,
डहाणू ३७.०,
पुणे ३६.७,
लोहगाव ३६.४,
अहिल्यानगर ४०.८,
जळगाव ४२.५,
कोल्हापूर ३६.१,
महाबळेश्वर २९.४,
मालेगाव ४२.६,
नाशिक ३६.४,
सांगली ३९.२,
सातारा ३७.६,
सोलापूर ४१.१,
धाराशिव ३९.६,
छत्रपती संभाजीनगर ३९.९,
परभणी ४१.९,
बीड ४१.५,
अकोला ४३.२,
अमरावती ४३.६,
बुलढाणा ४१.०,
ब्रह्मपुरी ४५.७,
चंद्रपूर ४४.८,
गोंदिया ४३.०,
नागपूर ४५.०,
वाशीम ४४.०,
वर्धा ४४.५,
यवतमाळ ४२.६.








