Cockroch Janta Party: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या संस्थापक अभिजित दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, पक्षाने महिला सदस्यांना प्रवक्त्या बनण्याची संधी दिली होती, पण ऑनलाइन ट्रोलिंग आणि धमक्यांमुळे अनेक महिलांनी सार्वजनिक भूमिका घेण्यास नकार दिला.आहे, त्यांनी तरुण महिलांना प्रवक्त्यांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले. याबाबतची माहिती त्यांनी एक्स हॅण्डलवर पोस्ट करून पक्षाची यावरील भूमिका स्पष्ट केली.
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी पक्षात महिला प्रवक्त्यांच्या अनुपस्थितीबाबत भूमिका मांडली आहे. याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देतांना ते म्हणाले की, पक्षाने आपल्या महिला सदस्यांना प्रवक्त्या बनण्याचा प्रस्ताव दिला होता.परंतु, सतत होणारे ऑनलाइन ट्रोलिंग, हल्ले आणि धमक्यांमुळे अनेक महिलांनी सार्वजनिकरित्या समोर येण्याचे टाळून संघटनेत सक्रिय भूमिका घेणे अधिक पसंत केले. दीपके म्हणाले की, पक्ष त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.या चळवळीचा भाग होऊ इच्छिणाऱ्या आणि प्रवक्त्या म्हणून जबाबदारी घेण्यास तयार असलेल्या तरुण महिलांनाही त्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

पत्रकार परिषदेत पक्षाने आपला अजेंडा जाहीर केला
दरम्यान गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत, कॉकरोच जनता पक्षाने स्पष्ट केले की, देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे. शिक्षण क्षेत्रातील सततच्या अपयशाबद्दल पक्षाने आणि त्यांच्या समर्थकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि शिक्षण प्रशासनात उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या भूमिकेवर भर दिला.
सीजेपीने तीन प्रवक्त्यांची नियुक्ती केली
तसेच बुधवारी, कॉकरोच जनता पक्षाने जनता आणि माध्यमांशी संवाद साधण्यासाठी तीन प्रवक्त्यांची नियुक्ती केली. सीजेपीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट ‘कॉकरोच इज बॅक’ द्वारे या नियुक्त्यांची माहिती दिली. ‘पोस्ट’च्या वृत्तानुसार, शोध पत्रकार सौरव दास यांना पक्षाचे मुख्य प्रवक्ते बनवण्यात आले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त, राजकीय संशोधक, लेखक आणि चित्रपट निर्माते विजेता दहिया आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी व जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी मॅकिन्सेशी संबंधित असलेले आशुतोष रांका यांचीही पक्षाचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.










