Motor Vehicle Rules Changed : रस्त्यांवरील वाढते अपघात, बेशिस्त वाहनचालक आणि निष्काळजीपणामुळे जाणारे निष्पाप जीव पाहता केंद्र सरकारने अखेर कठोर पाऊल उचलले आहे.
केंद्रीय मोटार वाहन कायदा, १९८९ मध्ये मोठे बदल केले असून, आता एका वर्षात पाचवेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनाचे रजिस्ट्रेशन रद्द आणि ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अपघातांचे भीषण वास्तव
जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान ३१,९५९ अपघातांत १३,९२१ जणांचा मृत्यू झाला. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ३२,७८३ अपघातांत १४,१८५ मृत्यू झाले, तर २०२५ मध्ये ३३,००२ अपघातांत १४,०६६ जणांना जीव गमवावा लागला. दंडाच्या रकमा वाढवूनही अपघात कमी न झाल्याने, सरकारने आता थेट वाहनचालकांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे.
तर चालान आपोआप रद्द
चालान जारी झाल्यापासून वाहन मालकाला ४५ दिवसांचा ‘ग्रेस पिरीयड’ (सवलतीचा काळ) दिला जाईल. त्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक असेल.
वाहन मालकांना मिळालेल्या चालानविरुद्ध ४५ दिवसांच्या आ संबंधित प्राधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येईल. प्राधिकाऱ्याला ३० दिवसांच्या आत त्या अर्जावर निकाल देण बंधनकारक आहे. अन्यथा ते चालान आपोआप रद्द होईल.
प्राधिकाऱ्याचा निकाल विरोधात गेला, तर पुढील ३० दिवसांत दंड भरावा लागेल. यावर असमाधानी असल्यास चालक न्यायालयात दाद माग शकतात. मात्र, न्यायालयात जाण्यापूर्वी दंड रकमेच्या ५० टक्के रक्कम परिवहन विभागाकडे जमा करणे अनिवार्य असेल, असे माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिकृत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.









