होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

होर्मूझचा तिढा कायम: अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणाले, अमेरिका-इराण शस्त्रसंधी संपलेली नाही

On: May 6, 2026 2:27 PM
Follow Us:
---Advertisement---

America Israel And Iran War: अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावानंतरही इराणसोबतची शस्त्रसंधी संपलेली नाही. त्यांनी पुढे असेही म्हटले की, तणावातील कोणतीही वाढ ही “शस्त्रसंधीचे उल्लंघन” आहे की नाही, हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरवतील, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे युएईवर झालेल्या हल्ल्याची भारताने निंदा केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

दरम्यान अमेरिकेला इराणने दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर मोजतबा खामेनी यांनी अमेरिका लादत असलेल्या आर्थिक युद्धाला तयार राहण्याचे आवाहन इराणी जनतेला केले होते. इराण आणि अमेरिकेचे एकमेकांना धमकी देण्याचे सत्र सुरूच आहे. इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनवर नवीन हवाई हल्ले केले असून, आणखी दोन शहरांसाठी सक्तीच्या विस्थापनाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. लेबनॉनवरील हल्ले इराण खपून घेणार नाही असा इशारा दिला आहे.

इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, राजकीय संकटावर कोणताही लष्करी तोडगा नाही. त्यांनी असेही म्हटले की, अमेरिकेने आणि संयुक्त अरब अमिरातीने (UAE) वाईट हेतू असलेल्या लोकांकडून पुन्हा दलदलीत ओढले जाण्याबाबत सावध राहिले पाहिजे. तसेच उच्चस्तरीय राजनैतिक अधिकाऱ्यांकडून आलेला एक संदेश आहे, ज्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी संयुक्त अरब अमिरातीवरील हल्ल्यांची पुष्टी केलेली नाही, आणि राजनैतिक चर्चेसाठीही वाव आहे, असे वृत्त अल जंजिराने दिले आहे.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, २ मार्च रोजी पुन्हा लढाई सुरू झाल्यापासून लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान २,७०२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

केतन हत्याकांडानंतर आणखी एक घटना उघडकीस; पत्नीने प्रियकर सोनूच्या मदतीने काढला मोनूचा काटा

ISRO Gets Bomb Threat: इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

23 political parties Letter to Chief Justice over SIR: निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी! देशातील 23 विरोधी पक्षांचे सरन्यायाधीशांना पत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येणार, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचा दुजोरा

बापरे..! शतकातील सर्वात मोठा भूकंप: मृतांची संख्या २३५ वर; जाणून घ्या कुठे घडली घटना..

बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या ‘नाफेड’ला नफा; डाळीचा प्रत्येक दाणा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार: केंद्रीयमंत्री अमित शहा

Leave a Comment