होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ‘श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा’; इ.९ वी अन् १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन

On: August 23, 2026 5:38 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: के.सी.ई. सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विश्व संस्कृत दिनानिमित्त व केसीईएस संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार जी बेंडाळे यांच्या संकल्पनेतून जळगाव महानगरस्तरीय ‘श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा–२०२६’*चे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृत भाषा, स्तोत्रपरंपरा आणि भारतीय संस्कृतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा मंगळवार, जळगाव येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद भवन, मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात होणार आहे. शहरातील विविध शाळांमधील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

दोन गटांत स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेचे आयोजन इयत्तेनुसार दोन गटांत करण्यात आले आहे. इयत्ता नववीसाठी ‘श्रीकृष्णाष्टकम्-स्तोत्रम्’, तर इयत्ता दहावीसाठी ‘श्रीरुद्राष्टकम्-स्तोत्रम्’ निश्चित करण्यात आले आहे.

विजेत्या संघांना रोख पारितोषिक

प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच प्रथम व द्वितीय उत्तेजनार्थ विजेत्या संघांची निवड करण्यात येणार आहे. सर्व पारितोषिके सांघिक स्वरूपाची असतील. प्रथम क्रमांकासाठी रु. १,५०१/-, द्वितीय क्रमांकासाठी रु. १,००१/-, तर तृतीय क्रमांकासाठी रु. ७०१/- रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व विद्यालयासाठी सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही उत्तेजनार्थ विजेत्या संघांना प्रत्येकी रु. ५०१/-, प्रमाणपत्र व विद्यालयासाठी सन्मानचिन्ह देण्यात येईल. दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यालयाला ‘डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे फिरता चषक’ हे विशेष पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

आध्यात्मिक- सांस्कृतिक परंपरेची ओळख

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत स्तोत्रांचे शुद्ध पठण, संस्कृत भाषेचा परिचय तसेच भारतीय आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शहरातील शाळांमधील संस्कृतप्रेमी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख प्रा. महेंद्र राठोड, स्पर्धा उपप्रमुख प्रा. एस. एस. कावळे तसेच संस्कृत शिक्षक प्रा.अर्जुन शास्त्री यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment