Latest Weather News: जळगावला पावसाची प्रतीक्षा असून ती आज संपेल अशी अशा जळगावकरांना आहे. आजपासून (सोमवार) पुढील तीन दिवस येलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सकाळीच काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहे. मात्र, शहरात चक्क ऊन पडले होते. वातावरणात काहीसा उकाडा ही जाणवत आहे. आणखी किती परीक्षा बघशील, अशी साद शेतकरी वरुण राजाला घालत आहे. दरम्यान उद्या राज्यात २० जिल्ह्यांना अति मुसळधार (Yellow Alart) पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
धुळे, नंदुरबार हलका पाऊस
दरम्यान धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पुढील चार दिवस दि. २७ ते ३१ जुलै दरम्यान ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक व घाटमाथा परिसराला ग्रीन अलर्ट असून या ठिकाणी हलका आणि मध्यम पावसाचा इशारा आहे. गेले काही दिवस घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरीला पूर आला होता. काही ठिकाणी नागरिकांना पूर भागातून बाहेर काढावे लागले. सध्या पाऊस ओसरला आहे.

चार जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट)
राज्यात चार ठिकाणी ऑरेंज आणि १५ जिल्ह्यात येलो अलर्ट आहे. पुणे, सातारा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी या चार जिल्ह्यांना सोमवारी आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर, अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दि. २८ ते ३१ जुलै दरम्यान सलग तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकण पट्टयाला येलो अर्लट जारी केला आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे. असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात हलका आणि मध्यम पाऊस सांगितला असला तरी पुणे घाटमाथा परिसरात आज ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे.










