होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भुसावळ हादरले: तळवेलमध्ये १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

On: August 13, 2026 5:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News: तळवेल ता. भुसावळ येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिला खाऊचे आमिष दाखवून विविध ठिकाणी अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका १५ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आरोपीना नायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. तर विधीसंघर्षग्रस्त बालकाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला गावातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास तळवेल येथील एका व्यक्तीच्या ढोरांच्या वाड्यातील पत्र्याच्या शेडमध्येही प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याशिवाय आरोपी क्रमांक दोन याने सहा ते सात महिन्यांपूर्वी, आरोपी क्रमांक तीन याने काही दिवसांपूर्वी, आरोपी क्रमांक चार याने पाच ते सहा महिन्यांपूर्वी, तर आरोपी क्रमांक पाच याने सात ते आठ दिवसांपूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश

याप्रकरणी मनोहर रामा पाटील, १५ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक, मधुकर विश्वनाथ भांरबे, नारायण सोमा चौधरी आणि विनायक वसंत पाटील (सर्व रा. तळवेल, ता. भुसावळ) यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २१६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६५(१) तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ४ व ६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हा दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१६ वाजता दाखल झाला. अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी नंदराज पाटील यांनी प्रकरणाची माहिती घेतली. सपोनि अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाकडून तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment