Jalgaon News: नगररचना विभागाला तीन तीन वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा त्यावर माहिती पुरवली जात नसल्याने स्थायी सभेत मनपा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी नगररचना विभागाचे अधिकारी अमोल पाटील यांना मला माहिती का दिली जात नाही, यावर, त्यांना पालिकेचे विविध समस्याबाबत जाब विचारून चांगलेच धारेवर धरले. त्यातच नगररचनेचे अधिकारी सभा सुरु झाल्यानंतर काही वेळाने सभागृहात दाखल झाल्याने सभापती चांगलेच संतापलेले दिसून आले.
जळगाव मनपाची आज ३ ऑगस्ट रोजी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त पंकज गोसावी, उपायुक्त धनश्री जोतीराम शिंदे, नगरसचिव मनोज शर्मा उपस्थित होते. .
स्थायी सभेत एकूण ११ विषय इतिवृत्तात होते, त्या सर्व विषयांना यावेळी मान्यता देण्यात आली. महासभेत पुढे बोलताना, सभापतींनी नगररचना विभागाचे अधिकारी अमोल पाटील यांना याबाबत विचारले माझ्याकडे कोणतेही पत्र आलेले नसून, मी कामात असल्याने ते पाहिले नसावे,असे उडवाउडवीचे उत्तर दिल्याने सभापतींचा राग अनावर झाला व त्यांनी लागलीच नगररचनेच्या अमोल पाटील यांना नोटीस बजावण्यास सांगितली. यावर उशिरा येण्याचे कारण विचारल्याने नगररचना विभागाचे अमोल पाटील यांनी सभागृहाची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली.

मेलेल्या जनावरांचे विल्हेवाट लावण्यासाठी दोन कर्मचारी कामावर असतांना त्यांना अत्यल्प पगारात काम करावे लागत आहे. तरी, संपूर्ण शहराची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने भंगाळे यांनी सांगितले. नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी भविष्यात कर्मचार्यांची गरज भासणार असल्याने नवीन दोन कर्मचार्यांची भरती करून त्यांना सध्या कामावर असलेल्या कर्मचार्यांनाच सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याच्या ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान नगरसेवक नितीन सपके यांनी कामांना मंजूर मिळत नसल्याने मनपावर नाराजी व्यक्त करत आम्ही लोकांना काय उत्तर द्यावे असा सवाल उपस्थित केला. मनपाकडून पाणीपुरवठ्यावर सुद्धा उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. मनपा पेक्षा ग्रामपंचायतचे काम लवकर होतात, असे वाटायला लागल्याचे त्यांनी सभापतींना खंत व्यक्त करून दाखवले. त्यांनी नवीन कामांच्या निविदा केव्हा निघणार यावर शहर अभियंता योगेश बोरोले यांना जाब विचारला.
त्यावर शहर अभियंता योगेश बोरवली यांनी कर्मचारी नसल्याने काम कसं करू अशी उत्तर देत डांबर आले आहे. पण, माणसं नाहीत त्यांना पगार मिळत नसल्याने कर्मचारी येत नाहीत, असे सांगितले. त्यावर सभापतींनी पंधरा दिवसात नवीन टेंडर काढून काम करण्याचे आदेश दिले. नगरसेवक सुरेश सोनवणे यांनी शहरात सुरू असल्याने ट्रेनच्या कामांमुळे रस्त्यावर चिखल होत असल्याचे निदर्शनास आणून देत, संबंधित मक्तेदाराने केलेल्या कामांवर माती टाकून जास्त चिखल होत असल्याने त्यास मुरूम टाकायला लावा असे सांगितले.
नगरसेवक नितीन लड्डा यांनी ड्रेनेजची स्वच्छता करण्यात यावी असा मुद्दा यावेळी उपस्थित केला. पावसामुळे नव्हते समस्या खूप मोठ्या निर्माण होत असल्याने पावसाळ्यात या जागेवर पाणी तुंबत असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने शहर अभियंता यांनी यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.
शिंदे नगरात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे लोकांना १२ ते १३ तास याच पाण्यात राहावे लागल्याने त्यांच्या घरात अंगणात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, त्यांचे मोठे नुकसान झाले यावर बांधकाम विवाहाने उपाययोजना करून त्या ठिकाणी पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, असे नगरसेवकांनी सांगितले. यावर शहर अभियंता उपाययोजना लवकरच करणार असल्याचे आश्वासन दिले.








