Jalgaon News: अखिल भारतीय स्तरावर बडगुजर समाज संघटनांना मजबूत करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीतर्फे भुसावळ येथे नुकतीच मोरया मंगल कार्यालय येथे अध्यक्षीय परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे विद्यमान अध्यक्ष भगवान लक्ष्मण बडगुजर (पनवेल) हे होते. तर भुसावळ नगरपालिकेचे शिक्षण समितीचे नगरसेवक राजेंद्रभाऊ आवटे याच्यासंह महासमितीचे महासचिव भालचंद्र विठ्ठल साळुंखे, मा.अध्यक्ष सुरेश शिवराम महाले, मा.अध्यक्ष प्रा.उमेश करोडपती आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या अध्यक्ष परिषदे प्रसंगी समाज संघटन मजबूत करणे, समाज कार्यात युवकांचा सहभाग वाढवणे, महिला सक्षमीकरण व समाजकार्यात महिलांचा सहभाग वाढवणे यासह समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालणे व राजकारणात समाजाचे स्थान निर्माण करणे अशा विविध विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आली. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश अशा विविध राज्यातील शहरी व ग्रामीण भागातून समाजातील अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांनी आपापल्या परिसरातील समाजातील प्रश्न यावेळी उपस्थित केले.

यावेळी समाजातील विविध भागातून उपस्थित पर्यवेक्षकांनी आपली मत मांडली व महासमिती अध्यक्ष व महासचिव यांच्या मान्यतेने समाजहित ठराव मंजूर करण्यात आले. सदर, अध्यक्ष परिषद यशस्वी होण्यासाठी महासमितीचे अध्यक्ष भगवान बडगुजर, महासचिव भालचंद्र साळुंखे, संघटक सुधीर बडगुजर, प्रदेश संघटक अमित बडगुजर, सौ.मनिषा बडगुजर, सुनील कोटवे, अध्यक्ष. सुरेश महाले, उपाध्यक्ष दिलीप बडगुजर, खजिनदार अनिल बडगुजर, भुसावळ मंडळाचे निलेश बडगुजर, संजय बडगुजर यांसह महासमितीचे पदाधिकारी, कार्यकारिणी व निमंत्रक सदस्य, भुसावळ बडगुजर समाज जागृती मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. महासमिती तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उपस्थित समाज मंडळ व संस्थांना महासमितीचे अध्यक्ष भगवान बडगुजर, महासचिव भालचंद्र साळुंखे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.









