होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

स्वप्निल सोनवणे यांचा ‘शिव छत्रपती महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने होणार सन्मान!

On: August 17, 2026 12:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: तालुक्यातील नंदगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा युवासेनेचे उपतालुका प्रमुख स्वप्नील सोनवणे यांना राज्यस्तरीय ‘शिव छत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026’ नुकताच जाहीर झाला असून त्यांचा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने पुणे येथे लवकरच भव्य पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे, असे ग्रुपचे अध्यक्ष संदीप गवई यांनी सांगितले आहे.

राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहायता गट, जिवनदिप अनाथाश्रम व वृध्दाश्रम व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना समाजरत्न गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते यंदा जळगाव जिल्ह्यातून स्वप्निल सोनवणे यांची निवड झाली आहे.

सोनवणे यांनी जळगाव ग्रामीणमध्ये मागील काही वर्षांत सामाजिक क्षेत्रात छाप सोडली असून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या काही वर्षातील सातत्यपूर्ण अशा उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतिने त्यांच्या कार्याचा गौरव व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा पुरस्कार जाहिर केला.राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराचे पुणे येथे भव्यदिव्य अशा समारंभात वितरण होणार आहे. सोनवणे हे जिल्हा मार्कटिंग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे तथा नंदगावच्या माजी ग्रा.प. सदस्या रजनी सोनवणे यांचे चिरंजीव असून या सन्मानाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

स्वप्निल सोनवणे यांचा यामुळे होतोय गौरव!

* सोनवणे यांनी युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चाने जळगाव जिल्ह्यातून पहिलाच असा ‘माहेरची साडी’ व ‘नंदलक्ष्मी सुकन्या योजना’ हा अभिनव उपक्रम राबवला.

* नानाश्री फाउंडेशनच्या मार्फत दरवर्षी मैत्रीदिन अथवा वाढदिवस अशा दिवशी वृद्धाश्रमात अन्नदान, बालसुधार गृहात संस्कारक्षम पुस्तकांचे वाटप.

* विविध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन व जनजागृती.

* गोरगरीबांना उबदार कपडे वाटप तसेच

* स्थानिक पातळीवर युवक, विद्यार्थी व जनतेचे प्रश्न, समस्या सोडवणे.

* विद्यार्थी संघटनेत असताना फीमाफी सारख्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांवर न्याय व हक्कासाठी यशस्वी लढा
.
* पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांवर वाचा फोडून निराकरण.

* जळगाव ग्रामीणमधल्या असंख्य समस्या जिल्हा प्रशासनासोबत पाठपुरावा करून सोडवणे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment