होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon Accident: दुर्देवी! भाजीपाला विक्रीसाठी जात असलेल्या महिलेला टँकरने चिरडले

On: August 5, 2026 4:35 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Accident: शहरातील राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान बुधवारी पुन्हा भीषण अपघात झाला. भरधाव टँकरने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत भाजीविक्री करणाऱ्या एका 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगला अर्जुन माळी (55, रा. ज्ञानदेव नगर) असं मृत महिलेचं नाव असून अपघातानंतर टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला आकाशवाणी चौकात पकडले. सदर, चालकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

मयत मंगला माळी ह्या शहातील ज्ञानदेव नगरातील रहिवासी होत्या त्या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. आज बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजार असल्याने त्या नेहमीप्रमाणे मुलगा भरतसोबत दुचाकीवरून पिंप्राळा येथे भाजीपाला विक्रीसाठी जात असताना अजिंठा चौफूली ते इच्छादेवी चौकदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे मायलेक रस्त्यावर फेकले जात मंगला माळी यांच्या अंगावरून टँकरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा भरत माळी हा जखमी झाला असून  त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला.

 

 

दरम्यान, घटनेनंतर नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त टँकर चालकावर कठोर कारवाई करण्याबरोबरच अपघाताला कारणीभूत ठरणारे महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली आहे.

 

टँकर चालकाचा घटनास्थळावरून पळ

 

अपघात घडल्यानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी टँकरचा पाठलाग करत आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला पकडले. त्यानंतर, चालकाला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment