Central Railway: मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत पुणे–दौंड रेल्वेमार्गावरील पुणे यार्ड येथे विद्यमान रेल्वे संरचनेतील डीडीएस पॉइंटच्या बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे.
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
1) गाडी क्रमांक 12136 नागपूर–पुणे एक्स्प्रेस- प्रवास प्रारंभ 1 ऑगस्ट 2026 रोजी नागपूर येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर–पुणे दरम्यान रद्द राहील.

2) गाडी क्रमांक 11406 अमरावती–पुणे एक्स्प्रेस- प्रवास प्रारंभ 1 ऑगस्ट 2026 रोजी अमरावती येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर–पुणे दरम्यान रद्द राहील.
3) गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी–पुणे एक्स्प्रेस- प्रवास प्रारंभ 31 जुलै 2026 रोजी जम्मूतवी येथून सुटणारी गाडी हडपसर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येईल. सदर गाडी हडपसर–पुणे दरम्यान रद्द राहील.
गाडीचे शॉर्ट ओरिजिनेशन
1) गाडी क्रमांक 12135 पुणे–नागपूर एक्स्प्रेस- प्रवास प्रारंभ 2 ऑगस्ट 2026 रोजी गाडी पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानक येथून सायंकाळी 5 वाजून 45 वाजता सुटेल.
रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण तसेच सुरक्षित रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी हे ट्रॅफिक ब्लॉक आवश्यक आहेत. या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त आहे. प्रवाशांनी या बदलांचा विचार करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन देखील रेल्वे प्रशासनाने केले आहे.










