होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

संतापजनक: आश्रमशाळेतील २२ अल्पवयीन विद्यार्थींनींचा विनयभंग; स्वयंपाक्याला अटक

On: August 28, 2026 4:40 PM
Follow Us:
---Advertisement---

Thane News: ठाण्यातील शाहपूर येथील एका सरकारी आश्रमशाळेत काम करणाऱ्या एका स्वयंपाक्याला २२ अल्पवयीन विद्यार्थींनींचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली नुकतीच अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाणे जिल्ह्यातील एका सरकारी आश्रमशाळेत काम करणाऱ्या एका स्वयंपाक्याला २२ अल्पवयीन विद्यार्थींनींचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली या आठवड्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आली. तो सराईत गुन्हेगार असून, त्याला यापूर्वी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत तुरुंगवास झाला होता. आणि नंतर त्याची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले. असे अमर उजाला वृत्तसंस्थेने वृत्तात म्हटले आहे.

यापूर्वीही अशाच गुन्ह्यांचे आरोपी

शहापूरच्या टेंबा येथील आश्रमशाळेत काम करणारा आरोपी गणपत गवळी हा सराईत गुन्हेगार होता. यापूर्वी आगाई येथील एका आश्रम शाळेतही त्याच्यावर अशाच प्रकारच्या गुन्ह्याचा आरोप होता. ही माहिती शाहपूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या (आयटीडीपी) प्रकल्प अधिकारी (पीओ) तेजस्विनी आर गलांडे यांनी दिली.

प्रकल्प अधिकारी काय म्हणाल्या?

त्या म्हणाल्या, गवळी याच्या सेवानिवृत्तीला फक्त १० महिने उरले होते, त्यांच्यावर यापूर्वी आगाई येथील दुसऱ्या आश्रमशाळेत लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता, आणि त्यावेळी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना कोणी आणि कसे पुन्हा सेवेत रुजू करून घेतले हे सध्या अज्ञात आहे.”

ही घटना केव्हा घडली?

टेंबा येथील शाळेतील पीडित विद्यार्थिनींनी सर्वप्रथम २४ ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, त्यानंतर अधीक्षकांनी हे प्रकरण मुख्याध्यापकांकडे पाठवले, ज्यांनी तात्काळ आदिवासी विकास विभागाला पत्र लिहिले. त्यांनी सांगितले की, शाहपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि आरोपीला अटक करण्यात आली.

गलांडे म्हणाले, “हे स्पष्ट आहे की तो अशा कृत्यांमध्ये सामील आहे, कारण १७ ते १८ मुली स्वतंत्रपणे एकच गोष्ट सांगतील हे संभव नाही.” अधिकाऱ्यांच्या मते, गवळीला यापूर्वी आघाई आश्रमशाळेत विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांची नियुक्ती मुरबाड येथील मोरोशी आश्रमशाळेत झाली होती, त्यानंतर अलीकडेच त्यांची टेंबा येथे बदली करण्यात आली, असे ही एका वृत्त संस्थेशी बोलतांना म्हणाल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

Leave a Comment