Bhusawal News: मध्य रेल्वेच्या इगतपुरी–भुसावळ दरम्यान भादली ते जळगांव पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांतर्गत भादली स्थानकाच्या यार्डचे पुनर्रचना तसेच पाचव्या मार्गासाठी जोडणी उपलब्ध करण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्यांच्या संचालनात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. खान्देशच्या प्रवाशांनी लक्षपूर्वक हे बदल जाणून घावे
प्रस्थान स्थानक येथून व रद्द केलेल्या गाड्या
दरम्यान इगतपुरी–भुसावळ मेमू १२ ऑगस्टला इगतपुरी येथून आणि भुसावळ–इगतपुरी मेमू भुसावळ येथून रद्द. देवळाली–भुसावळ मेमू देवळाली येथून तर भुसावळ-देवळाली ही भुसावळ येथून रद्द करण्यात आले आहे. याची दखल खान्देशच्या प्रवाशांनी घेण्यात आवाहन करण्यात आले आहे.
नंदुरबार – भुसावळ पॅसेंजर १२ ऑगस्टला नंदुरबार येथून तर भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर भुसावळ येथून रद्द. याच दिवशी नाशिक रोड–बडनेरा विशेष गाडी नाशिक रोड येथून आणि बडनेरा–नाशिक रोड विशेष गाडी बडनेरा येथून रद्द.
सूरत–भुसावळ एक्सप्रेस ११ ऑगस्टला सुरत येथून आणि भुसावळ–सूरत एक्सप्रेस १४ ऑगस्टला भुसावळ येथून रद्द.
दादर–भुसावळ विशेष गाडी १२ ऑगस्टला दादर येथून आणि
भुसावळ–दादर विशेष गाडी भुसावळ येथून रद्द. याच दिवशी भुसावळ–कटनी एक्स्प्रेस भुसावळ येथून रद्द. कटनी–भुसावळ १४ ऑगस्टला कटनी येथून रद्द करण्यात आले आहे.

मार्ग परिवर्तन करून चालविण्यात येणाऱ्या गाड्या
हिसार–हैदराबाद एक्स्प्रेस ११ ऑगस्टला हिसार येथून सुटणारी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन) –अकोला –पूर्णा मार्गे वळविण्यात येईल. अमृतसर–नांदेड एक्स्प्रेस ११ ऑगस्टला अमृतसर येथून सुटणारी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन) –अकोला–पूर्णा मार्गे वळविण्यात येईल.
१२ ऑगस्टला नियमन करण्यात आलेल्या गाड्या
बेंगलूरु – नवी दिल्ली एक्स्प्रेस मनमाड–जळगाव खंड दरम्यान दीड तास तर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस–गोरखपूर एक्स्प्रेस मनमाड–जळगाव खंड दरम्यान पावणे दोन तास नियमन केली जाईल. यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मनमाड–जळगाव खंड दरम्यान दीड तास तर मुंबई–आसनसोल एक्स्प्रेस मनमाड–जळगाव खंड दरम्यान दीड तास नियमन करण्यात येईल. लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर एक्स्प्रेस मनमाड–जळगाव खंड दरम्यान एक तास, अमृतसर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस खंडवा – भुसावळ खंड दरम्यान तर गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस खंडवा–भुसावळ खंड दरम्यान पावणे दोन तास नियमन करण्यात येईल.
जयनगर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस खंडवा–भुसावळ खंड दरम्यान दीड तास, गोंदिया–कोल्हापूर एक्स्प्रेस अकोला –भुसावळ खंड दरम्यान सव्वा तास
बनारस –हडपसर अमृत भारत एक्स्प्रेस खंडवा–भुसावळ खंड दरम्यान तीन तास नियमन करण्यात येईल.
एमजीआर चेन्नई सेंट्रल–भगत की कोठी एक्स्प्रेस खंड दरम्यान अकोला – जळगाव दोन तास नियमन केली जाईल. हडपसर–बनारस एक्सप्रेस १२ ऑगस्टला हडपसर येथून आठ एवजी सव्वा दहाला सुटेल.
या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास, गाड्यांची वक्तशीरपणा सुधारण्यास तसेच सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे संचालनास मोठी मदत होणार आहे.










