होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पत्नी अन् वडिलांना मोबाईलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवत तरुणाची आत्महत्या

On: August 27, 2026 4:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिकमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथील ३२ वर्षीय एका तरुणाने पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवून गोदावरी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पेठरोड येथील समर्थनगर भागात राहणारा शुभम मारुती पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान बुधवारी दुपारी गोदा पार्कजवळ नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगताना निदर्शनास आला. नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. त्यांनतर पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवली, तर, तो मृतदेह पेठरोड येथील शुभम पवार याचा असल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत शुभम पवार हा एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याने गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली. उडी मारण्यापूर्वी शुभमने हा टोकाचा निर्णय घेत त्याबाबत आपल्या पत्नीला आणि वडिलांना मोबाईलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवला होता. शुभमने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? याचे नेमके कारण समजू शकलेल नाही. या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाविस्कर करत आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment